Anushka-Nikhil Chavaan wedding | 'कारभारी लयभारी' फेम निखिल-अनुष्काचा संगीत-हळदी सोहळा, बीएमडब्ल्यूसह व्हिडिओ समोर

Anushka-Nikhil Chavaan wedding | 'कारभारी लयभारी' फेम निखिल-अनुष्काचा संगीत-हळदी सोहळा, बीएमडब्ल्यूसह व्हिडिओ समोर
Anushka-Nikhil Chavaan wedding
Anushka-Nikhil Chavaan weddingInstagram
Published on

मराठी मनोरंजन क्षेत्रातील चर्चेत असलेली जोडी अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

अलीकडेच या दोघांचा हळदीचा पारंपरिक सोहळा आनंदात पार पडला.

पिवळ्या रंगाच्या वेशभूषेत सजलेल्या अनुष्का आणि निखिल यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

कुटुंबीय, जवळचे मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातील खास क्षणांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

नव्या आयुष्याची सुरुवात नव्या गाडीने करतोय! तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असु द्या! असे म्हणत अनुष्काने नव्या बीएमडब्ल्यू गाडीचा व्हिडिओ शेअर केला.

हळदीनंतर आता संगीत सोहळ्याचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय.

लग्नसोहळ्यासाठी मंडप देखील सजला आहे. त्यांच्या विवाहसोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारभारी लयभारी या मालिकेत अनुष्का सरकटे आणि निखिल चव्हाण यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. मालिकेची कथा ग्रामीण राजकारण, सत्तासंघर्ष आणि नातेसंबंध याभोवती फिरत होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news