

मुंबई - बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे व्हीआयपी मार्गा विना त्यांनी सामान्य जनतेप्रमाणे रांगेत उभारून गणपतीची पूजा केली. यावेळच्या दर्शनाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत, हे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये अनुपम खेर मंडपाच्या बाहेर लांबलचक रांगेत उभारलेले दिसताहेत. ते हात जोडून बाप्पांच्या दर्शनासाठी उशीरापर्यंत रांगेत उभारलेले दिसले. मूर्ती जवळ पोहोचताच त्यांनी माथा टेकवत हात जोडून प्रार्थना केली.
अनुपम यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं - "आज लालबागच्या राजाचे दर्शन सौभाग्याने मिळाले. विना VIP दर्शन विना, तेव्हा काहीतरी चांगलं वाटलं. लाखोंची गर्दी असते, पण कमालीची शिस्त आणि व्यवस्था पाहून गर्व होतं. भक्तांच्या गणेशाच्या प्रती भावना अतूट आहे. गणपती बाप्पा मोरया!"
गणेश चतुर्थीच्या खास औचित्याने अभिनेत्री शिल्पा शेट्टीने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. व्हिडिओमध्ये ती ग्रीन-ब्राऊन साडीत दिसते. ती बाप्पांच्या चरणी असलेल्या जास्वंदाचे फुल आशीर्वाद म्हणून घेत बाप्पांच्या भक्तीत लीन होते. दरम्यान, शिल्पाचे फॅन्सनी मंडप बाहेर गर्दी केली. यावेळी तिने फॅन्ससोबत फोटो, सेल्फी क्लिक केले.
शिल्पा लवकरच 'KD: द डेविल' मध्ये दिसणार आहे. संजय दत्त, नोरा फतेही, ध्रुव सरजा यासारखे स्टार्स देखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. हिंदी सोबत तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम भाषेत चित्रपटा पाहता येणार आहे. हा चित्रपट ४ सप्टेंबर रोजी रिलीज होईल.
मलायका लाईट ब्ल्यू कलर सलवार सूटमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला पोहोचली. यावेळचा तिचा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल होत आहे.
video- jitendra8088 Instagram वरून साभार