Annu Kapoor On Om Puri: ओम पुरींनी माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं... अन्नू कपूर यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट

Annu Kapoor On Om Puri
Annu Kapoor On Om Puripudhari
Published on
Updated on

Annu Kapoor On Om Puri: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिवंगत दिग्गज अभिनेते ओम पुरी यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत, मात्र त्यांच्या खासगी आयुष्यातील एक काळी बाजू आता समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि सूत्रसंचालक अन्नू कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ओम पुरी यांच्याबाबत गंभीर गौप्यस्फोट केला आहे. "ओम पुरी एक महान अभिनेते होते, पण एक पती म्हणून त्यांनी माझ्या बहिणीला धोका दिला आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त केले," अशा शब्दांत अन्नू कपूर यांनी आपला संताप व्यक्त केला.

Annu Kapoor On Om Puri
Navjot Sidhu property | नवजोत सिद्धूंनी केले संपत्तीचे वाटप: मुलीला मिळाले आलिशान घर, तर मुलाच्या वाट्याला काय?

नेमकं प्रकरण काय?

अन्नू कपूर यांची बहीण सीमा कपूर आणि ओम पुरी यांचा विवाह झाला होता. मात्र, लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्या सुखी संसाराला तडा गेला. सीमा कपूर जेव्हा तीन महिन्यांच्या गरोदर होत्या, तेव्हा त्यांना समजले की ओम पुरी यांचे दुसऱ्या महिलेसोबत (नंदिता पुरी) प्रेमसंबंध सुरू आहेत. 'सिटी ऑफ जॉय' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ओम पुरी आणि पत्रकार नंदिता पुरी यांची जवळीक वाढली होती.

Annu Kapoor On Om Puri
Supreme Court| दहा वर्ष... ८० पेक्षा अधिक खटले, ५ कोटी रुपये, 3BHK फ्लॅट... अखेर सुप्रीम कोर्टाकडून घटस्फोटाच्या वादावर पडदा

गर्भावस्थेत असतानाच सोडले घर

सीमा कपूर यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, त्या काळात ओम पुरी खूप दारू पिऊ लागले होते आणि नंदितामुळे घरात रोज वाद होत असत. हा मानसिक छळ सहन न झाल्याने तीन महिन्यांच्या गरोदर असताना सीमा यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या मित्रांना या अफेअरबद्दल माहिती होती, पण त्यांनी सीमा यांना अंधारात ठेवले. घटस्फोटानंतर ओम पुरी यांनी पाठवलेली २५ हजार रुपयांची मदत सीमा यांनी नाकारली होती, कारण तो त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न होता.

Annu Kapoor On Om Puri
Om Puri : खूप गरिबीत गेलं होतं ओम पुरी यांचं बालपण, मग एकेदिवशी …

अन्नू कपूर यांची हतबलता

अन्नू कपूर यांनी सांगितले की, त्या वेळी ते आपल्या बहिणीसाठी खूप काही करू इच्छित होते, पण ते हतबल होते. "ओम पुरी मला घाबरायचे कारण मी स्पष्टवक्ता आहे. माझ्या बहिणीने आयुष्यभर खूप सोसले, तिला कोणाचाही आधार नव्हता," असे अन्नू कपूर म्हणाले. ओम पुरी यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात सीमा कपूर यांनीच त्यांची काळजी घेतली होती, याचाही उल्लेख त्यांनी केला.

१९९३ मध्ये ओम पुरी यांनी नंदिता पुरी यांच्याशी लग्न केले, ज्यांच्यापासून त्यांना इशान हा मुलगा आहे. २०१७ मध्ये ओम पुरी यांचे निधन झाले, परंतु निधनापूर्वी त्यांनी सीमा कपूर यांची फोनवरून माफी मागितली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news