

अनन्या पांडे ही चंकी पांडे यांची कन्या आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलीवूडमध्ये कारकीर्द घडविण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये 'स्टुडंड ऑफ द इअर २' या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता चाहत्यांमध्ये अनन्या ही किती मोठ्या संपतीची मालकीण आहे, याची माहिती घेण्याची नक्कीच उत्सुकता असेल. तिने चित्रपट, जाहिराती आणि शोजच्या माध्यमातून बक्कळ संपत्ती कमावली आहे. अनन्याने गेल्याच वर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नवीन घर विकत घेतले होते. इतकेच नाही तर तिच्याकडे आलिशान गाड्यांचे कलेक्शनही आहे. अनन्याच्या कार कलेक्शनमध्ये १.७० कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू -७ सीरिजचाही समावेश आहे. तसेच तिच्याकडे १.८४ कोटी रुपयांची रेंज रोव्हर स्पोर्ट, ८८ लाख रुपयांची मर्सिडीज बेंज ई क्लास, ३३ लाख रुपयांची स्कोडा कोडियाक आणि ३० लाख रुपयांची हुंडाई सांता फे या गाड्या आहेत. अनन्या २०१९ मध्ये ५४ कोटी रुपयांची संपत्तीची मालकीण होती. २०२० मध्ये तिच्या संपत्तीत वाढ होऊन ५८ कोटी रुपये झाली, तर २०२१ मध्ये ६६ कोटी रुपये आणि २०२२ मध्ये ७० कोटी रुपये इतकी झाली. आता अनन्या ही सुमारे ७४ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण असल्याचे सांगितले जाते.