Anant-Radhika Wedding : रिलायन्स कर्मचा-यांना शेव, चिवड्याच्या पाकिटांचे वाटप

Anant-Radhika Wedding
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या विवाहानिमित्त रिलायन्स कर्मचा-यांना चिवडा, भुजिया शेवच्या पाकिटांचे वाटप करण्यात आलेTwitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Anant-Radhika Wedding : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी उद्या मुंबईत एका शानदार सोहळ्यात राधिका मर्चंटसोबत लग्न करणार आहे. लग्नातील पाहुण्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्काम आणि भव्य भेटवस्तूंसह शाही स्वागत केले जात आहे, तर रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना देखील हा प्रसंग साजरा करण्यासाठी खास ‘खाऊ’ची भेट मिळाली आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांना मिळालेल्या गिफ्ट बॉक्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

खाऊच्या बॉक्सचा रंग लाल असून त्यावर सोनेरी रेषा आहेत. त्यावर लिहिले आहे की, ‘आमच्या देवी-देवतांच्या दैवी कृपेने, आम्ही अनंत आणि राधिकाचे लग्न साजरे करत आहे. नीता आणि मुकेश अंबानींच्या शुभेच्छा.’ बॉक्सच्या आत हल्दीरामच्या सॉल्टीची चार पॅकेट, मिठाईचा बॉक्स आणि चांदीचे नाणे आहे. नमकीन पॅकेटमध्ये हल्दीरामची आलू भुजिया शेव आणि खमंग चिवड्याच्या पाकिटाचा समावेश आहे. गिफ्ट बॉक्सचा व्हिडिओ शेअर करताना तान्या राजने लिहिले की, ‘रिलायन्समध्ये काम करण्याचे फायदे.’

नीता आणि मुकेश अंबानी यांनी त्यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नापूर्वी 50 जोडप्यांचा सामूहिक विवाहही आयोजित केला होता. या जोडप्यांना अंबानी कुटुंबाकडून सोन्या-चांदीचे दागिने, किराणा सामान आणि इतर घरगुती वस्तूंसह 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

दरम्यान, अनेक पाहुण्यांनी त्यांना मिळालेल्या आलिशान लग्नाच्या आमंत्रणांची छायाचित्रे आधीच शेअर केली होती. 12 जुलैला लग्न होणार आहे. त्यानंतर 15 जुलैला रिसेप्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमंत्रणाचा भाग म्हणून, पाहुण्यांना चांदीचे ‘यात्रा मंदिर’, पश्मिना शाल आणि बरेच काही देण्यात आले आहे.

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाआधीचे विधी मार्चमध्ये तीन दिवस चालले. उत्सवाची सुरुवात एका भव्य समारंभाने झाली, जिथे पाहुण्यांना जामनगरमधील विस्तीर्ण रिलायन्स इस्टेटमध्ये नेण्यात आले. जामनगर महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रिहानाची खाजगी मैफल, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिलजीत दोसांझचा परफॉर्मन्स झाला. जामनगरमधील सेलिब्रेशननंतर लंडनमध्ये वधू-वरांच्या मित्रांसाठी खासगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, जूनच्या सुरुवातीला, अंबानी कुटुंबाने शेकडो पाहुण्यांसाठी इटली आणि फ्रान्समध्ये स्टॉपसह लक्झरी क्रूझचे आयोजन केले. गेल्या आठवड्यात, प्रत्यक्ष लग्नाआधी, अंबानी कुटुंबाने एक संगीत समारंभ, गरबा, हळदी कार्यक्रमाचे आयोजन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news