

Preetika Rao Harshad Arora
मुंबई : 'बेइन्तेहा' या मालिकेतून अभिनेत्री प्रीतिका रावचे बॉलीवुड कनेक्शनही खास आहे. प्रीतिका अमृता रावची बहीण आहे. सध्या प्रीतिका एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. या मालिकेत प्रीतिका हर्षद आरोरासोबत दिसली होती. या मालिकेतील त्यांच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीची खूप चर्चाही झाली होती. ही जोडी प्रेक्षकांना इतकी भावली कि त्यांनी ऑफस्क्रीनही त्यांची जोडी जुळवायला सुरुवात केली.
यावर मात्र प्रीतिका चांगलीच भडकली आहे. यावर बोलताना तिने हर्षदवर खळबळजनक आरोपही केला आहे. ती म्हणते, ‘टेलिव्हिजनविश्वातील बऱ्याच महिलांशी त्याचे शारीरिक संबंध आहेत.’
या आरोपाचे निमित्त ठरले ती प्रीतिका आणि हर्षदची मालिकेतील एक रोमॅंटिक क्लिप एक फॅन पेजवर व्हायरल होण्याचे. प्रीतिकाच्या इच्छेविरोधात ही क्लिप व्हायरल करणाऱ्या पेजवर तिने राग व्यक्त केला. या रोमॅंटिक क्लिप्स स्क्रिप्टचा भाग आहेत त्यामुळे त्या परत परत पोस्ट करू नयेत. मी याबाबत पुनः पुनः सांगितले आहे कि भेटलेल्या प्रत्येक महिलेशी शारीरिक जवळीक साधणाऱ्या त्या व्यक्तीसोबत माझे कोणतेही व्हिडियो पोस्ट करू नयेत.
हर्षद आणि प्रीतिका बेइन्तेहानंतर कुठेही एकत्र दिसले नाहीत. यादरम्यान हर्षद आरोराने मुस्कान राजपूतसोबत 2024 मध्ये लग्नगाठ बांधली आहे.
प्रीतिकाने त्या पेजला खडसावले आहे. तुम्ही हे सर्व माझ्या इच्छेविरुद्ध करत आहात. तुम्ही केलेले कर्म तुमच्या सोबत येईल. बेइन्तेहामध्ये 95 % भाग हा इतर कंटेन्ट होता तर 5 % भाग हा ईंटीमसीचा होता. हे व्हीडीयो तुम्ही माझ्या इच्छेविरोधात पोस्ट करत आहात. या कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
प्रीतिकाने 2010 मध्ये तमिळ सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. बेइन्तेहाच्या माध्यमातून यशाची चव चाखली. प्रीतिका सेटवर अत्यंत नखरे करायची तसेच तिच्या अनप्रोफेशनल वागण्यामुळे शोमधूनही तिला काढले असल्याचे समोर येत आहे. याशिवाय ती लाल इष्क या मालिकेतही दिसली होती.