अमोलची कॅन्सरशी झुंज सुरु, 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत भावनिक क्षण!

Appi Amachi Collector | 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत भावनिक क्षण!
Appi Amachi Collector
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत भावनिक क्षण पाहायला मिळणार!instagram
Published on
Updated on

पुढारी आ२नलाईन डेस्क - 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत अमोलची कॅन्सरशी झुंज सुरु आहे. अमोलचा आजार तिसऱ्या स्टेजला पोहोचलेला आहे. त्यामुळे घरी सगळ्यांना टेन्शन आहे. अमोल म्हणतो तुम्ही रडलात तर मी लवकर जाईन. अमोल इतक्या भयानक आजाराशी सामना करतोय हे बघताना प्रत्येक दिवस अप्पी आणि अर्जुनसाठी कठीण जात आहे. अमोलच्या सांगण्यावरून सगळ्यांनी दिवाळी एकत्रित साजरी केली. घरी कोणालाच कामावर जायची इच्छा नाहीये, पण अमोल एकेकाला छडी घेऊन हाकलतो, कामाच्या ठिकाणी कुणाचच मन लागत नाहीये. दिवसा अप्पी तर अर्जुन नाईट ड्यूटी घेतो. अमोलला घरच्या सगळ्यांचे दुःख कळतंय तेव्हा तो ठरवतो की जाण्याआधी मी सगळ्यांचे आयुष्य सुखी करून जाणार!

आता केमोथेरपीचा सामना करत असताना अमोलची त्याच्या आजाराशी लढाई अधिक तीव्र होत जाणार आहे. परंतु, तो प्रत्येक दिवस पूर्णपणे जगण्याचा दृढनिश्चय करतोय. केमोथेरपीमुळे अमोलचे केस काढले जातात. त्यामुळे घरच्या सगळ्यांना वाईट वाटतंय, घरचे सगळेच पुरुष त्याच्यासोबत केस काढायला बसतात पण अमोल त्यांना थांबवतो.

कॅन्सर वॉर्डमध्ये असलेली लहान मुले आणि त्यांच्या पालकांना दुःखी बघून अमोलला वाईट वाटतं आणि तो काहीतरी शक्कल लढवून तिथले वातावरण बदलतो, सगळ्यांना खुश करतो. अमोलला जड औषधांमुळे त्रास होतोय, पण त्यातून अप्पी व अर्जुन त्याला बाहेर काढतात! दोघांनाही दिवसा आणि रात्री ड्यूटी असल्यामुळे त्यांना एकत्र एकच तास मिळतो, तो ते अमोलसोबत घालवतात. या कठीण परिस्थितीत अमोलच मनोबल वाढवायला अप्पी, अर्जुन आणि संपूर्ण कुटुंब त्याच्या सोबत आहे. अचानक अमोलची प्रकृती बिघडल्याने तणाव वाढतो. तर दुसरीकडे संकल्पचा छुपा धोका सर्वांवर आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' सोम- शनी संध्या ६:३० वा. झी मराठीवर भावनिक क्षण पाहता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news