अमिताभ बच्चन यांची को-स्टार ब्लॅक फेम आयशा कपूर विवाह बंधनात
पुढारी ऑनलाईन डेस्क - २० वर्षांपूर्वी रिलीज झालेला चित्रपट 'ब्लॅक'मध्ये राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी बालकलाकार आयशा कपूर विवाह बंधनात अडकली. तिने दिल्लीमध्ये गुरुद्वारामध्ये लॉन्गटाईम बॉयफ्रेंड एडम ओबेरॉयशी शीख धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न केले. गुलाबी पेहरावात आयशा खूप सुंदर दिसत होती. तिने सोशल मीडियावर वेडिंग फोटोज शेअर केले आहेत.
संजय लीला भन्सालींचा चित्रपट 'ब्लॅक' २००५ मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते. Ayesha Kapur ने राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारली होती. तिला या चित्रपटात असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या रणबीर कपूरने ट्रेनिंग दिली होती.
लग्नात उपस्थित होते जवळचे लोक
दिल्लीमध्ये हा एक खासगी सोहळा पार पडला. ज्यामध्ये फक्त जवचे लोक सहभागी झाले होते. लग्नात आयशाने गुलाबी रंगाचा लहेंगा तर एडमने पेस्टल कलर शेरवानी परिधान केली होती.
लग्नाआधी आयशाने आपल्या गर्ल गँगसोबत बॅचलरेट पार्टी देखील केली. तिने केरलच्या कोवलम बीचवरूल पार्टीचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आयशा सध्या एक इंटीग्रेटिवह न्यूट्रिशन हेल्थ कोच म्हणून काम करते. तामिळनाडूच्या ऑरोविलेमध्ये जन्मलेली आयशा लक्झरी ब्रँड हायडिझाईनचे फाऊंडर दिलीप कपूर यांची मुलगी आहे.
ब्लॅक चित्रपटानंतर आयशाने २००९ मध्ये 'सिकंदर' मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती लाईमलाईटपासून दूर गेली. ती सुशांत सिंह राजपूत सोबत शेखर कपूर यांच्या 'पानी'मध्ये दिसणार होती. पण हा चित्रपट रिलीज झाला नाही.

