

आपल्यापैकी अनेकांना बराच काळ अनेकांना वैताग आणणारी बिग बीच्या आवाजातील कॉलर ट्यून अखेर बंद झाली आहे. फोन लावण्याच्या घाईत दरवेळी जबरदस्ती ही कॉलरट्यून ऐकावी लागत असल्याने लोक चांगलेच वैतागले होते. ही कॉलरट्यून ऑनलाईन फ्रॉडपासून सावध करण्यासाठी सेट केली गेली होती. युजरनी या विरोधात संताप व्यक्त केल्याने ही बंद केली आहे.
ही ट्यून बंद होताच सोशल मिडियावर मिम्सना उधाण आले. यावरचे मजेदार मिम्सपाहून तुम्हालाही हसू अवरणार नाही. बऱ्याच युजरने या निर्णयाचे दुखाचे कनेक्शन रेखा यांच्याशी जोडले जात आहे.
एक युजर म्हणतो, ‘ इतकी आनंद मला यापूर्वी कधीच झाला नाही.’ दूसरा म्हणतो 'बरं झाले, मी यामुळे खूपच त्रासलो होतो. दूसरा म्हणतो, देवाचे आभार हे खूपच त्रासदायक आहे. तर एकाने समय है आपसे विदा लेने का अशी tagline टाकली आहे.
या कॉलरट्यूनमुळे वैतागलेल्या लोकांनी थेट बिग बी यांनाच धारेवर धरल. त्यांनी x या प्लॅटफॉर्मवर एक साधारण पोस्ट शेयर केली होती. या कॉलर ट्यूनमुळे भडकलेले युजर म्हणतो, 'फोनवर बोलणे बंद करा.’ यावर बिग बीनीही उत्तर दिले की 'सरकारला सांगा त्यांनी मला जे सांगितले ते मी केले.’ आता ही कॉलर ट्यून बंद झाल्याने बिग बी यांच्यासह युजरनीही सुटकेचा श्वास सोडला.
बिग बी आगामी सेक्शन 84 मध्ये दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत निमरत कौर, अभिषेक बॅनर्जी आणि डायना पेंटी हे कलाकार आहेत.