

पुढारी ऑनलाईन डेस्क - गदर २ चित्रपटानंतर अमीषा पटेल पुन्हा चर्चेत आलीय. गेल्या वर्षी ती गदर २ मध्ये सकीनाच्या भूमिकेत दिसली होत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. चित्रपटाने चांगली कमाई देखील केली. आता डेटिंगच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री अमीषाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून सोशल मीडिया युजर्स असा अंदाज लावत आहेत की, सकीना त्या व्यक्तीला डेट करत आहे. (Ameesha Patel)
अमिषा पटेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीसोबत दिसत आहे. असे म्हटले जात आहे की, तो व्यक्ती एक करोडपती उद्योगपती आहे. हा फोटो दुबईचा असून त्यात दोघेही जवळ दिसत आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, DUBAI —- lovely evening with my darling @nirvaanbirla ♥️♥️💖💖💖हा फोटो व्हायरल होत आहे आणि दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या कॉमेंट लोक करत आहेत. याबाबत अमीषा किंवा निर्वाण यांच्याकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. (Ameesha Patel)