पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट या वर्षातील सवोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. 'पुष्पा 2' मधील गाणी आणि धमाकेदार टिझर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आवडता अभिनेता अल्लू अर्जुन पुन्हा पुष्पाच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहते उत्सुक आहेत. मात्र, आता एकिकडे अल्लू अर्जुनने 'जवान' फेम दिग्दर्शक अॅटलीचा चित्रपट नाकारल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे अल्लूच्या जागी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या नावाची चर्चा होत आहे.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज होणार होता. मात्र, नुकतेच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या टीमकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, अल्लू अर्जुनचे निकटवर्तीय सरथचंद्र नायडू यांनी हा चित्रपट शेड्यूलनुसार प्रदर्शित होणार नसल्याचा खुलासा केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी खूपच प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच दरम्यान चित्रपटाचे शूटिंग अजून संपले नसल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे मिळालेल्या माहितीनुसार, 'जवान' फेम दिग्दर्शक अॅटलीचा त्याच्या आगामी प्रोजेक्ट संदर्भात अल्लू अर्जूनशी चर्चा करत होते. मात्र, दोघांच्यात निश्चितपणे कोणतेही बोलणी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. अॅटली चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत असून त्यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानची संपर्क साधला आहे. यामुळे चाहत्यांनी अॅटलीच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये अल्लू अर्जुन नाही तर सलमान दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, याबबातची अधिकृत्त कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
अल्लू आणि अॅटली एकत्र आले तर आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट पाहायला मिळेल असेही म्हटलं गेलं आहे. याशिवाय पुष्पाचे चित्रीकरण संपले नसावे म्हणून अल्लूने नवीन चित्रपटाकडे दुर्लक्ष केल्याचेही बोलले जात आहे.
'पुष्पा 2' हा २०२१ मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा' चित्रपटाचा सिक्वेल आहे. या अँक्शन ड्रामा चित्रपटामध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदान्ना दिसली आहे. याशिवाय फहद फाजील, राव रमेश, अनुसया भारद्वाज, सुनील आणि इतर कलाकारांनी भारदस्त भूमिका साकरल्यात. सुकुमार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. देवी श्री. प्रसाद चित्रपटाला संगीत दिले आहे.
हेही वाचा