
पुढारी ऑनलाईन डेस्क : अल्लू अर्जुन त्याचा २२ वा चित्रपट प्रसिद्ध चित्रपट निर्माता एटली सोबत करणार आहे. ८ एप्रिलला अल्लूच्या ४३ व्या वाढदिवसानिमित्त ही विशेष घोषणा करण्यात आली. अल्लू अर्जुनच्या जन्मदिनी त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. चित्रपटाचे दिग्दर्शन एटली करणार आहेत.
आज प्रोडक्शन हाऊस सन पिक्चर्सने ८ एप्रिल, २०२५ ला एक्सवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. अल्लू अर्जुनने साऊथ दिग्दर्शक एटली सोबत मिळून एक 'शानदार' प्रोजेक्ट बनवलं आहे. जे याआधी कधीही पाहिलं गेलं नाही. हा चित्रपट सायन्स-फिक्शन ॲक्शनर असेल. AA22xA6 असे नाव असण्याची शक्यता आहे.
हा अल्लू अर्जुनचा २२ वा आणि एटलीचा सहावा चित्रपट आहे. यासाठी निर्मात्यांनी 'AA22xA6' चे हॅशटॅग देखील शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलं, 'लँडमार्क सिनेमॅटिक इवेंटसाठी तयार व्हा. AA22xA6 - सन पिक्चर्स कडून एक दमदार मास्टरपीस.' व्हिडिओमध्ये 'स्टायलिश स्टार' अल्लू अर्जुन चेन्नईमध्ये प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसकडे जाताना दिसत आहे. तिथे दिग्दर्शक एटली आणि निर्माते कलानिधी मारन यांच्याशी भेटतात. तिघे चर्चा करताना आणि अधिकृत पद्धतीने प्रोजेक्ट लॉक करताना दिसत आहेत.
अल्लू अर्जुन आणि दिग्दर्शक ॲटली यांच्या चित्रपटाचे पोस्ट सन पिक्चर्सने एक्स अकाऊंटवर शेअर केलेले दिसले. पण चर्चा अशी झाली की, AA22xA6 च्या पोस्टरमध्ये आणि २०२१ मधील हॉलीवूड चित्रपट 'डून' च्या पोस्टरमध्ये बरेच साम्य आहे. त्यामुळे 'Dune' च्या पोस्टरची कथितपणे कॉपी केल्याची चर्चा सुरु आहे.