पुढारी ऑनलाईन
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे कपल त्यांच्या रिलेशनशिपमुळे बी टाऊनमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकतेच आलियाने सोशल मीडियातील पोस्टमध्ये रणबीरविषयी जे म्हटले, त्याचीही चर्चा आता होऊ लागली आहे. या सोशल मीडिया पोस्टमध्ये आलियाने रणबीरचा प्रथमच 'बॉयफ्रेंड' असा उल्लेख केला आहे. स्वतःची काही छायाचित्रे तिने शेअर केली आहेत, जी रणबीरने क्लिक केली होती.
आलिया-रणबीर हे कपल न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी आफ्रिकेतील समाई मारा येथे गेले होते, तेव्हा तिथे रणबीरने आलियाचे हे फोटो काढले होते. या पोस्टमध्ये आलियाने कॅप्शनमध्ये म्हटले होते की, 'बॉयफ्रेंडच्या फोटोग्राफीचे कौशल्य पाहा.'
आतापर्यंत आलिया कधीच रिलेशनशिपबाबत काहीही उघडपणे बोलली नव्हती; पण पहिल्यांदाच तिने रणबीरचा उल्लेख 'बॉयफ्रेंड' असा केल्याने चर्चा तर होणारच. दरम्यान, याच वर्षी हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती आहे. रणबीर मुंबईत नवे घर बांधत असून येथेच हे दोघे राहू शकतात.