‘बच्चन पांडे’साठी अक्षयने घेतले 99 कोटी रुपये

‘बच्चन पांडे’साठी अक्षयने घेतले 99 कोटी रुपये

पुढारी ऑनलाईन

अक्षयकुमारचा आगामी चित्रपट 'बच्चन पांडे' होळीचे औचित्य साधत 18 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी अक्षयने 99 कोटी रुपये मोबदला घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटासाठी 175 कोटी रुपये दिले आहेत, असेही कळते. हा चित्रपट थेट ओटीटीवर येणार होता, पण सध्या कोरोनापरिस्थिती झपाट्याने सुधारत असल्याने थिएटर्स खुले झाले आहेत. त्यामुळे हा चित्रपट थिएटर्समध्ये रीलीज करण्याचे निर्मात्यांनी ठरवले आहे.

2014 मधील सुपरहिट तमिळ चित्रपट 'जिगरठंडा'चा हा रीमेक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. चित्रपटात कृती सेनन, जॅकलीन फर्नांडिस, अरशद वारसी आणि अभिमन्यू सिंह यांच्याही भूमिका आहेत. दरम्यान यावर्षी अक्षयचे 'पृथ्वीराज', 'राम सेतू', 'रक्षाबंधन', 'सिंड्रेला', 'गोरखा' आणि 'ओह माय गोड 2' हे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या रांगेत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news