पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा 'खेल खेल में' राजकुमार रावचा 'स्त्री 2' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' हे चित्रपट एकाच दिवशी पडद्यावर येणार आहेत. यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस सिनेमा रसिकांसाठी सर्वात मोठा फिल्मी वीकेंड ठरणार आहे. कारण, अक्षय कुमारचा 'खेल खेल में', राजकुमार रावचा 'स्त्री 2' आणि जॉन अब्राहमचा 'वेदा' यांच्यात बॉक्स ऑफिसवर लढत बघता येणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक चित्रपटाचा स्वतःचा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. अक्षय एक स्टार पॉवर चित्रपट घेऊन येणार आहे. तर राजकुमार रावने पॉवरहाऊस म्हणून स्वतःची प्रतिमा प्रस्थापित केली आहे. आणि तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती व्यक्तिरेखा बिकी म्हणून परत येत आहे.
बॉक्स ऑफिसवर वेगळीच लढाई अनुभवयाला मिळणार आहे. जॉन अब्राहमच्या "वेदा" ची अनोखी चर्चा असून तो पॉवरहाऊस कामगिरीचा ट्रेडमार्क आहे. या महाकाव्य बॉक्स ऑफिस लढाईची अपेक्षा प्रेक्षकांना असताना चाहते उत्सुकतेने चर्चा करत आहेत की, कोणता चित्रपट सुपरहिट ठरणार!. अक्षय कुमारचा 'खेल खेल में' विजयाकडे नेईल का? राजकुमार रावचा 'स्त्री २' मूळची जादू पुन्हा गाजवेल का? की "वेदा" मधला जॉन अब्राहमचा दमदार अभिनय बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवेल?. अशी चर्चा रंगली आहे.
अक्षय कुमारचे या वर्षी 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि 'सरफिरा' असे दोन चित्रपट रिलीज झाले आहेत. तर राजकुमार रावने 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' मधील त्याच्या अभिनयाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि स्वत:ला सर्वात शक्तीशाली अभिनेता असल्याचे सिद्ध केलं आहे. आणि तो 'स्त्री २' सोबत हॅट्ट्रिक मारण्याच्या तयारीत आहे.
दुसरीकडे जॉन अब्राहम त्याच्या चाहत्यांना 'पठाण' पासून वाट बघायला लावत आहेत. त्याच्या "वेदा" साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. १५ ऑगस्ट हा दिवस बॉलिवूड आणि त्याच्या चाहत्यांसाठी रोमांचक असणार आहे. एकाच वेळी तीन बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सिनेप्रेमींना अनोखी पर्वणी असणार आहे.