Nana Patekar: नाना पाटेकरांच्या निधनाने अक्षय कुमार भावुक; ‘वेलकम’च्या सेटवरील आठवणींनी डोळ्यांत अश्रू

अभिनेता अक्षय कुमारने नाना पाटेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून, त्यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
Akshay Kumar Nana Patekar
Akshay Kumar Nana PatekarFile Photo
Published on: 
Updated on: 

Akshay Kumar reaction Nana Patekar death

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वावर शोकाकुल वातावरण पसरले आहे. अभिनेता अक्षय कुमारने नानांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून, त्यांच्यासोबतच्या कामाच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

अक्षय कुमारची भावुक प्रतिक्रिया

अक्षय कुमारने 'एक्स'वर अत्यंत भावुक संदेश लिहिला आहे. "नानांच्या निधनाच्या बातमीने मला अत्यंत दुःख झाले आहे. प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी फार काही करावे न लागणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांपैकी ते एक होते. तो भारदस्त आवाज, ती अभिनय शैलीतील तीव्रता आणि प्रत्येक भूमिकेतील प्रामाणिकपणा... ते स्वतःमध्येच एक वेगळे आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते," अशा शब्दांत अक्षय कुमारने नानांच्या अभिनयशैलीचे कौतुक केले आहे.

Akshay Kumar Nana Patekar
Nana Patekar: रांगड्या अभिनयाने प्रेक्षकांना जिंकणारा 'नटसम्राट'; रंगभूमीपासून बॉलिवूड गाजवणाऱ्या नानांचा थक्क करणारा प्रवास

'वेलकम' आणि 'हाऊसफुल ५'च्या आठवणींना उजाळा

अक्षय कुमारने नाना पाटेकर यांच्यासोबत अनेक चित्रपटामंध्ये काम केले आहे. याबाबत त्याने लिहिले आहे की, "मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला त्यांच्यासोबत 'वेलकम' आणि अलीकडेच 'हाऊसफुल ५' मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटांच्या सेटवर घालवलेले क्षण आणि आठवणी मी आयुष्यभर माझ्या हृदयात जपेन. नाना खरोखरच अद्वितीय होते. तुम्ही आता आपल्यात नाहीत यावर विश्वास बसणे कठीण जात आहे. त्या सर्व आठवणींसाठी धन्यवाद. तुमची खूप आठवण येईल, जी शब्दांत मांडणे कठीण आहे."

अक्षय कुमार आणि नाना पाटेकर यांची 'वेलकम' (२००७) या चित्रपटातील 'राजीव' आणि 'उदय शेट्टी' ही जुगलबंदी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अक्षयच्या या पोस्टवर चाहत्यांनीही मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहिली आहे.

गमन, प्रहार, अपहरण, राजनीती, अब तक छप्पन, खामोशी, नटसम्राट अशा असंख्य हिंदी- मराठी चित्रपटांमधून दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. गोव्यातील दोना पावला येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाना पाटेकर हे कामानिमित्त गोव्यात गेले होते. बुधवारी संध्याकाळी ते गोव्यातील एका कार्यक्रमात उपस्थितही होते. यानंतर नाना पाटेकर दोना पावला येथील निवासस्थानी परतले. गुरुवारी पहाटे ५ च्या सुमारास नाना पाटेकर यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने गोव्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5. 20 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

Akshay Kumar Nana Patekar
Nana Patekar passes away: “माझे जवळचे मित्र…” नाना पाटेकर यांच्या निधनाने राजकीय नेतेही भावूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news