Zainab Ravdjee | कोण आहे नागार्जूनची होणारी सून जैनब रावदजी?
पुढारी ऑनलाईन डेस्क - नागार्जुन आणि अमला अक्किनेनी यांचा मुलगा आणि तेलुगु अभिनेता अखिल अक्किनेनीने जैनब रावदजीसोबत साखरपुड्याची घोषणा केली आहे. जुबली हिल्स हैदराबादमध्ये अक्किनेनी निवासस्थानी आयोजित खासगी समारंभात या कपलने साखरपुडा केला. त्यांचे लग्न २०२५ होण्याची शक्यता आहे.
नागार्जुनने पोस्टमध्ये लिहिले की, “आम्ही आमचा मुलगा अखिल अक्किनेनी आणि आमची होणारी सून जैनब रावदजी यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना रोमांचित झाले. आम्ही आमच्या परिवारात जैनब यांचे स्वागत करण्यासाठी उत्साहित आहे. कृपया कपलला आशीर्वाद द्या.”
अखिलने देखील सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो पोस्ट करताना आनंद व्यक्त केला.
कोण आहे जैनब रावदजी?
जैनब रावदजी प्रसिद्ध बिझनेसमॅन फॅमिलीतून आहे. तिचे वडील जुल्फी रावदजी एक प्रसिद्ध बिझनेसमॅन आहे. हैदराबादमध्ये जन्मलेल्या २७ वर्षांची जैनब मुंबईत मोठी झाली. जैनब एक आर्टिस्ट आहे आणि तिने दुबई-लंदनसहित अनेक शहरांमध्ये आपली कला सादर केली आहे. पेंटिंग शिवाय जैनबने अभिनयात देखील नशीब आजमावले आहे. शिवाय, तिला परफ्युम बिझनेसबद्दलही ज्ञान आहे. वन्स अपॉन द स्किन नावाने ती एक ब्लॉग चालवते.

