मुलीच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगनची भावनिक पोस्ट म्हणाला, बाळ...

Ajay Devgan : लाडक्या मुलीसह सेल्फी घेत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 Ajay Devgan
मुलीच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगनची भावनिक पोस्ट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रसिद्ध अभिनेता अजय देवगन याची मुलगी न्यासा (Nyasa Devgan) २२ वर्षाची झाली असून रविवारी (दि.२० ) तिच्या वाढदिवसानिमित्त त्याने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसोबतच्या फोटोसहित भावनिक पोस्ट शेअर केली आहे. (Ajay Devgan)

अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांची मुलगी न्यासा (Nyasa Devgan) सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती अनेक कार्यक्रमांना आणि बॉलीवूड पार्टीना कायमच हजेरी लावत असते. रविवारी २० एप्रिलला तिचा वाढदिवस असल्याने अजयने तिच्या वाढदिवसानिमित्त 'x' वरून फोटो शेअर करत फोटोला भावनिक कॅप्शन दिले आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटले आहे की, न्यासा हट्ट धरते म्हणून सेल्फी घ्यावा लागतो. नेहमी आठवणी जपल्याबाद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाळ! मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, अशी भावनिक पोस्ट करत त्याने आपल्या लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Ajay Devgan)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news