

पुढारी ऑनलाईन डेस्क - ऐश्वर्या राय-अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यानबिग बी अमिताभ बच्चन यांची पोस्ट व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या एका कॅप्शनच्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेगास्टार अमिताभ यांची क्रिप्टिक पोस्टमध्ये नेमकं काय आहे? जाणून घेऊया. अमिताभ बच्चन यांनी बुधवार, २३ ऑक्टोबरला रात्री उशीरा सोशल मीडियावर लिहिलं, ‘टी 5172- चले भैया.’ नेटिझन्सनी त्याचे वेगवेगले अर्थ काढले. काही फॅन्सना वाटले की, अमिताभ आपल्या अंदाजात गुड नाईट म्हणत आहेत.
अभिषेक बच्चननेदेखील बुधवारी आपल्या चित्रपटाचा टीजर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं होतं-‘आम्ही अशा एका व्यक्तीबद्दल जाणतो, ज्याच्याबद्दल बोलणे जीवन आहे. ही अशा एका व्यक्तीची कहाणी आहे, जो आयुष्याच्या चांगल्या बाजूकडे लक्ष देतो. मग कसलेही संकट येवो. अशा व्यक्तींना टॅग करा, जे बातचीत करण्यासाठी जगतो.’
अमिताभ बच्चन यांनी मुलाची पोस्ट रिट्वीट केली आणि लिहिलं, ‘ओह वाह. ग्रेट अभिषेक…हे प्रेम पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.’ दरम्यान, बच्चन परिवारने अभिषेक-ऐश्वर्याच्या घटस्फोटावर मौन बाळगले आहे. दोन्ही स्टार्स मागील काही महिन्यांपासून घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. दोघांच्या लग्नाला १७ वर्षे झाली आहेत.
ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या अफवा तेव्हा सुरु झाल्या, जेव्हा ती बच्चन परिवाराशिवाय अनंत अंबानीच्या लग्नात पोहोचली. त्यावेळी ती मुलगी आराध्या बच्चन सोबत दिसली. त्यावेळी अभिषेकने इन्स्टाग्रामवर दुसऱ्या व्यक्तीच्या एका ‘घटस्फोटा’च्या पोस्टवर लाईक केलं होतं. नंतर ऐश्वर्यादेखील वेगवेगळ्या कार्यक्रमात एकटीच दिसली. ‘SIIMA’ ॲवॉर्डमध्ये देखील अभिषेक बच्चन शिवाय ती पोहोचली होती. तिला बेस्ट ॲक्ट्रेस (क्रिटिक्स) ॲवॉर्डने सन्मानित करण्यात आलं होतं.