Aghathiyaa | रहस्य, रोमांचने भरलेले 'अगथिया' चे मोशन पोस्टर रिलीज

रहस्य, रोमांचने भरलेले 'अगथिया' चे मोशन पोस्टर रिलीज
Aghathiyaa movie
रहस्य, रोमांचने भरलेले 'अगथिया' चे मोशन पोस्टर रिलीज झाले आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - रहस्य, फॅन्टसी, हॉरर आणि थ्रिलने भरलेल्या चित्रपट 'अगथिया'चा मोशन पोस्टर निर्माते अनीश अर्जुन देव आणि डॉ. इशारी के. गणेश यांनी सोशल मीडियावर रिलीज केला आहे. वाइड अँगल मीडियाच्या सहकार्याने डॉ. इशारी के. गणेश यांनी सादर केलेल्या या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पी. ए. विजय यांनी केले आहे. चित्रपटासाठी संगीत युवान शंकर राजा यांनी दिले असून, सर्व गाणी स्वतः दिग्दर्शक पी. ए. विजय यांनी लिहिली आहेत.

चित्रपटाच्या नावाप्रमाणेच 'अगथिया'चा मोशन पोस्टरही रहस्यमय आणि थरारक वाटतो. पोस्टरच्या सुरुवातीला जुनी घड्याळे, त्यातील यंत्रे आणि मशीनरीसारख्या आकृती दाखवण्यात आल्या आहेत. या दृश्यांमधून 'अगथिया' असे अँटिक स्टाईलमध्ये नाव समोर येते, ज्यासोबत 'एंजल वर्सेस डेविल' असे सब हेडलाईन दिसते. हे सब हेडलाइन तमिळ, तेलुगु, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये बदलत जाते.

पोस्टरच्या शेवटी एक भयानक दृश्य दाखवले आहे, ज्यामध्ये जादूगारासारख्या कपड्यांमध्ये एक व्यक्ती, ज्याचे चेहरा जळत्या आगीसारखा आहे, मोठी ऑप्टिकल रॉड हातात धरून भीतीदायक पद्धतीने फिरवताना दिसतो. मोशन पोस्टर केवळ रहस्यमय नसून अनेक प्रश्न निर्माण करते, ज्यांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरच मिळतील.

चित्रपटाचे निर्माते अनीश अर्जुन देव आणि डॉ. इशारी के. गणेश म्हणाले, "ही फॅन्टसी हॉरर आणि थ्रिलर चित्रपट एका तरुण आर्ट डायरेक्टरच्या संघर्षाची कथा सांगतो. तो एका जुन्या कॅमेऱ्याच्या मदतीने १९४० च्या काळात पोहोचतो आणि इतिहासातील अनेक गुपितांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटात ब्रिटिश राजवटीच्या दृश्यांमुळे प्रेक्षकांना अनोखा अनुभव मिळेल. चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून, लवकरच त्याचा टीझर आणि ट्रेलर रिलीज केला जाईल."

डॉ. गणेश यांनी याआधीही अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'अगथिया - एंजल वर्सेस डेविल' हा महत्वाकांक्षी चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपटाचा थरारक ३१ जानेवारीला अनुभवता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news