'इंडियाज गॉट लॅटेंट' वाद प्रकरणी मुंबई पोलिसांची खार स्टुडिओवर धडक

India's Got Latent controversy | 'इंडियाज गॉट लॅटेंट' वाद प्रकरणी मुंबई पोलिसांची खार स्टुडिओवर धडक
India's Got Latent controversy
'इंडियाज गॉट लॅटेंट' वाद प्रकरणी मुंबई पोलिसांची खार स्टुडिओवर धडकfile photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - | 'इंडियाज गॉट लॅटेंट' वाद प्रकरणी मुंबई पोलिसांची खार स्टुडिओवर धडक मारली. इंडियाज गॉट लॅटेंट वाद समोर आल्यानंतर, मुंबई पोलिसांची एक टीम खार स्टुडिओमध्ये पोहोचली आहे, जिथे शो शूट झाला होता, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिलीय.

यूट्यूबर रणवीर इलाहाबादियाच्या एका शोमध्ये करण्यात आलेल्या असभ्य विधानानंतर वाद चिघळला आहे. या प्रकरणानंतर दिल्लीमध्ये सीपीआय खासदार पी. संदोष कुमार म्हणाले, "...असे अनेक युट्यूबर आहेत, जे समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. या लोकांचा हा घाणेरडा धंदा आहे. आणि यासाठी समाजाला किंमत चुकवावी लागते...."

रणवीर अलाहबादिया, अपूर्व मखीजा, समय रैना विरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल

सूत्रांनुसार इंडियाज गॉट लॅटेंट आयोजकाविरोधात लेखी तक्रार झाली आहे. कॉमेडियन समय रैनाचा हिट स्टँड-अप कॉमेडी शो - 'इंडियाज गॉट लॅटेंट' मध्ये आक्षेपार्ह विधानमुळे युट्यूबर रणवीर अलाहबादिया विरोधात तक्रार दाखल केली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी अश्लील विधानावर कारवाई करण्याबाबत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले- रणवीर अलाहबादिया आणि समय रैनावर कारवाई होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की- अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा हा अर्थ नाही की, काहीही बोला...आमच्या समाजात आम्ही काही नियम बनवले. जर कुणी उल्लंघन करत असेल तर हे खूपच चुकीचं आहे आणि त्यांच्याविरोधात कडक कारवाई होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news