

पुढारी ऑनलाईन डेस्क - सोनी लिव्हचा गुप्तहेरीशी संबंधित रोमांचक अदृश्यम २- दि इन्विन्सिबल हिरोजचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे अटीतटीच्या लढाईला सज्ज होण्याची वेळ आली आहे. येत्या ४ एप्रिलपासून प्रदर्शित होणारा हा सीझन ॲक्शनने, खिळवून ठेवणारे ट्विस्ट्स आणि अज्ञात शत्रूंविरूद्ध सामना यांनी परिपूर्ण आहे. तणाव वाढत असताना या मालिकेत एक नवीन चेहरा येत आहे - तो म्हणजे अभिनेत्री पूजा गोर. ती ऑफिसर दुर्गाच्या भूमिकेत आपल्याला दिसणार असून त्यामुळे मिशनमध्ये एक नवीन ऊर्जा येईल.
रवी वर्माची भूमिका साकारणारा एजाज खान म्हणाला की, "अदृश्यम-२ हा अधिक मोठा, साहसी आणि रोमांचक आहे. या सीझनमध्ये रवी एकटा लढत नाहीये. त्याच्यासोबत पूजा गोरने साकारलेली एक गुप्तहेर एजंट दुर्गा आहे, जी युद्धभूमीवर एक नवीन दृष्टीकोण आणि एक अजिंक्य शक्ती घेऊन येते. आम्ही एकत्र येऊन पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक शत्रूंचा सामना करत आहोत. तुम्हाला सीझन १ रोमांचक वाटला असेल तर दुसरा सीझन त्याहीपेक्षा बरेच काही देणारा आहे."
या शोबद्दल बोलताना दुर्गाच्या भूमिकेत असलेली पूजा गोर म्हणाली की, "ही भूमिका मी यापूर्वी केलेल्या सर्वच भूमिकांपेक्षा वेगळी आहे. माझे पात्र फक्त एक अधिकारी नाही तर ती एक अथांग शक्ती आहे. ती आपल्या लोकांच्या सुरक्षेसाठी लढण्यास, पाठलाग आणि त्याग करण्यास तयार आहे. तिच्यासमोरील आव्हाने प्रखर आहेत. ती तिची परीक्षा पाहतात. परंतु ती कधीही मागे हटत नाही. अदृश्यम २ हा एक अत्यंत रोमांचक अनुभव आहे आणि प्रेक्षकांसमोर तो येताना मी खूप उत्सुक आहे!"
बॉम्बे शो स्टुडिओज एलएलपीच्या मदतीने सचिन पांडे आणि आदित्य पांडे यांची निर्मिती आहे. अदृश्यम २ - द इनव्हिजिबल हिरोज ४ एप्रिलपासून सोनी लिव्हवर पाहता येणार.