Adarsh Shinde Vad Paachi Song | आरडी चित्रपटातलं धमाल "वढ पाचची" गाणं लाँच

आदर्श शिंदे म्हणतोय "वढ पाचची"
 Adarsh Shinde Vad Paachi Song
'आरडी' २१ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीलाInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील 'आरडी' चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं "वढ पाचची..." हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं आहे. २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "वढ पाचची" हे अतिशय धमाल गाणं आहे. 'पार्टी साँग' म्हणता येईल असं हे गाणं आहे गीतकार मंदार चोळकर यांनी लिहिलं आहे. शब्दरचना, वरूण लिखाते यांचे तर आदर्श शिंदे यांनी गायलं आहे.

साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे. आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news