Tanishaa Mukerji : व्हाईट साडीत तनिषाने दुर्गापूजेत नृत्यावर धरला ठेका
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात सध्या नवरात्रोत्सव मोठा उत्साहात साजरा केला जात आहे. नऊ दिवस देवीची आराधना करून मोठ्या भक्तिभावाने भाविक पूजा अरतात. दरवर्षी अनेक बॉलीवृड सेलिब्रिटीही दुर्गापूनेत सहभागी होत असतात. याचदरम्यान, एका दुर्गापूजेतील अभिनेत्री तनिषा मुखर्जी हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडीओत देवीच्या गाभाऱ्यात काहीजण बंगाली नृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये तनिषाही आहे. पांढऱ्या रंगाची साडी नेसून खास लूक करून तनिषा दुर्गा पुजेत सहभागी झाल्याचे दिसत आहे.
तनिषा ही काजोलची बहीण आहे आणि दिग्गज अभिनेत्री तनुजा यांची धाकटी लेक आहे. तनिषाने बॉलीवूड पदार्पण केले, पण तिला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तिचे चित्रपट सपशेल आपटले. त्यानंतर तनिषा अभिनयापासून दूर आहे. बहीण काजोलने मात्र, जबरदस्त अभिनय करत बॉलीवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तुम मिली तो सही, अंतर, बी केअरफुल अशा मोजक्याच काही सिनेमांमध्ये तनिषाने अभिनय केला आहे. तनिषाच्या दुर्गापूजेतील व्हायरल व्हिडीओचर प्रक्षेकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्याचे दिसून येत आहे.

