चंद्रपुरात ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांनी धरला गोंडी नृत्यावर ठेका

पोंभूर्णा येथे कार्यकर्ता मेळाव्यासाठी जाधव यांची उपस्थिती
Bhaskar Jadhav Gondi dance
भास्कर जाधव
Published on
Updated on

चंद्रपूर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रपूर जिह्यातील पोंभूर्णा येथे आले होते. यावेळी मंचावर आदिवासी बांधवांनी गोंडी नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी आदिवासी बांधवांबरोबर भास्कर जाधव यांनीही गोंडीनृत्यावर ठेका धरला.

पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडणार ‘छोटा चंद्र’ !

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्यांचा दावा मजबूत करण्यासाठी त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पोंभूर्णा शहरात आयोजित करण्यात आला होता. यासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. जाधव हे चंद्रपुरात आल्यांनतर ते पोंभूर्णा येथे पोहचले. त्या ठिकाणी जाधवांचा स्वागत समारंभ पार पडला. त्या ठिकाणापासून मेळावा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणाकडे वाजतगाजत मान्यवरांना नेण्यात येत असताना आदिवासी बांधवांचे गोंडी नृत्याचे सादरीकरण केले. गोंडीनृत्यावर वाजतगाजत जाधवांना सभास्थळी नेत असताना भास्कर जाधवांना रहावले नाही. त्यांनीही नृत्य सादर करण्याऱ्या आदिवासी बांधवांसोबत गोंडीनृत्यावर ठेका धरला.

Bhaskar Jadhav Gondi dance
भास्कर जाधव म्हणाले, “किरीट सोमय्यांनी स्वतःवरील दगड हल्ला घडवून आणला”

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news