Spruha Joshi
Spruha Joshi

Spruha Joshi : श्रावणात खेकड्यांवर मारला ताव, स्पृहा जोशी झाली ट्रोल; नेटकरी म्हणाले…

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी ( Spruha Joshi ) छोट्या पडद्यावरील 'लोकमान्य' या मालिकेतून खूपच चर्चेत आली आहे. नाटक, मालिका आणि अनेक चित्रपटात तिने भारदस्त अभिनय साकारला असून नुकताच तिच्या मांसाहार करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, या व्हिडिओमुळे स्पृहाला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये स्पृहा जोशी ( Spruha Joshi ) आणि अभिनेता विनोद गायकर  गेले होते. यावेळी स्पृहा खेकड्यावर ताव मारताना दिसली. या व्हिडिओतून स्पृहाने 'खेकडा कसा खायचा, खेकडा खाताना फॅन्सी वागू नये…तो हातानेच खायला पाहिजे', असे तिने म्‍हटलं आहे. यावेळच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.

स्पृहाने श्रावण महिन्यात मांसाहार केल्याने नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केले आहे. यात नेटकऱ्यांनी तिला 'स्पृहा देवाला तरी घाबरा', 'आजपासून तुला अनफॉलो करणार आहे', 'अरे श्रावण चालू आहे', 'पापा केहेते है बडा नाम करेगी, खेकडा खाके बडा काम करेगी'. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

हेही वाचा : 

(video : aasova_andvinod_gaikar instagram वरून साभार)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news