

Actress shubhangi gokhale on Ashadhi wari
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीचा उत्साह आहे. पंढरीच्या राजाला भेटण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला वारकरी अखंड चालतो आहे. वारीमुळे सोशल मिडियावरील माहोलदेखील भक्तिमय झाला आहे. कलाकार देखील वारीत जाऊन फोटोसेशन करणे ते सोशल मिडियावर शेयर करत आहेत. पण या सगळ्या प्रकाराबाबत अभिनेत्री शुभांगी गोखले मात्र कमालीच्या उद्विग्न आहेत
इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये त्या लिहितात, ‘ खूप वर्षांपासून मनात येत रहातं
वारी वर्षानुवर्षं शांतपणे,शिस्तबद्ध चाललेली असताना
तिथे मोठाल्या गाड्या नेऊन खिचडी ची पाकिटं ने केळी वाटायची, मेकप करून त्या अन्नपूर्णांच्या मध्ये जबरदस्तीनी घुसून भाक-या भाजायच्या..
असे अनेक प्रकार करून क्या भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा.. कशासाठी?!
काही दिवसांत “काजवा महोत्सव” नामक प्रकार सुरू होईल.
त्यांचा मिलनाचा काळ..मादी जमिनीलगत असते, नर आपल्या प्रकाशानी तीला आकर्षित करत असतात..
अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत,टॉर्चेस चा प्रकाश न् बडबड करून घोळक्यानी तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची.. खूनच करायचा..😔
खूप लिहायचंय
पण उद्विग्नतेमुळे थकले
😔
रामकृष्ण हरी🙏🏼
पांडुरंगा.. सांभाळ रे
शुभांगी आपल्या स्पष्ट आणि परखड बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे शुभांगी यांच्या या पोस्टवर बहुतांश कमेंट्स या त्यांच्या पोस्टचे कौतुक करणाऱ्या आहेत. त्यापैकी एक युजर म्हणतो, खरं आहे, साधारणतः 2007-08 च्या पूर्वीचा काळ असेल जेव्हा वारी आणि पालखी बघायला सामान्य लोकं किंवा भाविक लोकं हे कित्येक तास वाट बघत असतं आणि दर्शन झाल्यानंतर जो आनंद मिळायचा तो चेहऱ्यावर ओसंडून वाहत असे पण जसे कॅमेरा वाले मोबाइल हातात यायला लागले तिथून दर्शन साठी जोडले जाणारे हात फक्त कॅमेरा मध्ये फोटो काढायला सरसावले आणि दर्शन घेताना देवाच्या चरणी लीन होणारे मस्तक उलट्या बाजूच्या कॅमेरात capture व्हायला लागले.
सोशल मीडियासाठी शिवशिवणारे हात देवासमोर जोडायचे मात्र ह्या पिढीने सोडून दिले की काय हे त्यांच्या वागण्यावरून दिसून येते, ही शोषल बाजू आता प्रत्येक आनंदाचा क्षण capture करायच्या नादात आनंद साजरा करायचं विसरून गेलेत वारी हे फक्त निमित्त पण घरची पुजा, लग्न, डोहाळे किंवा लहान मुलांचा बारसे, अन्नप्रशान ह्या विधीत देखील सोशल उत्सव जास्त असतो' . तर सगळ्या निसर्गाचा विचका कसा करता येईल हेच लोकांना माहिती आहे . हे मत दुसऱ्या युजरने व्यक्त केले आहे.