

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सांवत आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे नेहमी चर्चेत असते. आता ती तिसऱ्या लग्नाबाबत चर्चेत आली आहे. या चर्चेदरम्यान पाकिस्तानमधल्या एका कलाकाराचं नाव पुढे आले असून त्याच्याशी लग्न करण्याचा विचार असल्याचे राखीने 'टाईम्स ऑफ इंडियाला' दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
या मुलाखतीदरम्यान राखीने पाकिस्तानात लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी ती म्हणाली की, मला लग्नाबाबत अनेक प्रस्ताव आले असून यातून मी चांगल्या नात्याचा विचार करू शकते. पाकिस्तानात माझे अनेक चाहते असून मी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला भेट दिली होती. या मुलाखतीदरम्यान तिने आपण पाकिस्तानी कलाकार डोडी खान यांच्याशी लग्न करण्यास इच्छूक असल्याचे सांगितले.
लग्नाबाबत बोलताना राखी पुढे म्हणाली, माझे लग्न इस्लामिक विधींसह पाकिस्तानात झाले तर रिसेप्शन भारतात होईल व आम्ही हनिमूनसाठी स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्सला जाऊ, असे तिने यावेळी स्पष्ट केले. तसेच आम्ही दुबईमध्ये स्थायिक होणार असल्याचेही तिने यावेळी सांगितले.
राखी सावंत हिने २०१९ मध्ये रितेश नावाच्या एनआरआय तरुणासोबत लग्न केलं होतं. दुर्दैवाने त्यांचा २०२२ मध्ये घटस्फोट झाला. त्यानंतर तिने आदिल खान दुर्राणी याच्याशी लग्न केले. अदिलशी लग्न करण्यासाठी तिने इस्लाम धर्म स्वीकारत राखी हे नाव बदलत फातिमा केले असल्याचा दावा केला होता. त्यानंतर काही कारणास्तव त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आदिलने 'बिग बॉस फेम' सोमी खानशी लग्न केले.