

पुढारी ऑनलाईन डेस्क - ड्रामा क्वीन राखी सावंतला सायबर सेलने समन्स पाठवले असून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ‘इंडियाज गॉट लॅटेंट’ शो मधील वादग्रस्त विधान प्रकरणी राखी सावंतला देखील समन्स पाठवण्यात आले आहे. अभिनेत्री राखीला २७ तारखेला चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणातील अन्य कॉमेडियन्सची चौकशी होणार आहे.
इंडियाज गॉट लॅटेंट’ शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली. या विधानाचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत. शोच्या एपिसोडमध्ये उपस्थित असणाऱ्यांची नावेदेखील समोर असून त्यांची चौकशी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मुखिजा आणि समय रैना यांची नावे समोर आहेत. रणवीरला पाठिंबा देत राखीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये तिने , ‘त्याला माफ करा… काही हरकत नाही, असं होऊन जातं… काही वेळेस माफ करायला हवं… मला माहिती आहे, त्याने चुकीचं वक्तव्य केलं आहे. पण त्याला माफ करा…’ असं म्हटलं होतं.