Nayanthara Romantic Photos : तू माझं सर्वस्व...; नयनताराने पतीचे उघडपणे घेतलं चुंबन

तू माझं सर्वस्व...; नयनताराने पतीचे उघडपणे घेतलं चुंबन
Nayanthara Romantic Photos
तू माझं सर्वस्व...; नयनताराने पतीचे उघडपणे घेतलं चुंबनNayanthara instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ अभिनेत्री नयनतारा नेहमीच तिचा पती विघ्नेश सिवानसोबत फॅमिली फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ती पती विघ्नेश सिवानवरील प्रेम व्यक्त करायला अजिबात विसरत नाही. तिने विघ्नेश सिवानचा आज ३९ वा वाढदिवस साजरा केला आहे. याच दरम्यान नयनतारा रोमँटिक होवून विघ्नेशला उघडपणे चुंबन घेतलं आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री नयनताराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर विघ्नेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एक खास पोस्ट शेअर केली. यामध्ये अभिनेत्रीने बर्थडे पार्टी आणि डिनरचे कोही फोटो शेअर केले आहेत. फोटोंमध्ये विघ्नेशचा ३९ वा वाढदिवस साजरा करताना दोघेजण दिसत आहेत. दोघेजण रेस्टॉरंटच्या बाहेरील बाजूस असून रोमँटिक होत सेलिब्रेशन केलं आहे. याच दरम्यान नयनतारा आणि विघ्नेश एकमेकांना मिठी मारली आणि चुंबन घेतले आहे.

नयनताराने यावेळी ऑलिव्ह ग्रीन जॅकेटसोबत ब्लॅक टॉप परिधान केला आहे. तर विघ्नेशने काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. हे फोटो पहाटेच्यावेळी काढले असावेत कारण, फोटोत थोडा अंधार आणि सुर्यप्रकाशही दिसत आहे. पोस्ट शेअर करत नयनताराने लिहिले आहे की, "माझ्या सर्व गोष्टींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी तुझ्यावर शब्दांच्या पलीकडे प्रेम करतो. देव तुला आयुष्यात जे काही हवे आहे ते देवो, माझे उर उलागम."

यानंतर विघ्नेशने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर हे फोटो पुन्हा शेअर करून लिहिले आहे की, "माझे सर्व काही तू." या जोडप्याची रोमँटिक केमिस्ट्री पाहून चाहते त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव करत आहेत. नयनतारा आणि विघ्नेश यांचा विवाह ९ जून २०२२ रोजी झाला होता. हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, नयनतारा सध्या तिच्या मल्याळम चित्रपट 'डियर स्टूडेंट्स' च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित संदीप कुमार आणि जॉर्ज फिलिप हे करत आहेत. गेल्या वर्षी तिने शाहरुख खानसोबतच्या 'जवान' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होतं.

Nayanthara Romantic Photos
Vignesh-Nayanthara : नयनताराने जुळ्या मुलांसोबत साजरा केला पोंगल (Photos)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news