Shefali Jariwala Death | 'कांटा लगा' गर्ल शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं नेमकं कारण काय? पोस्टमॉर्टम पूर्ण

शेफाली जरीवालाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी केली जात आहे
Shefali Jariwala
Shefali JariwalaInstagram
Published on
Updated on

Shefali Jariwala Death

'कांटा लगा' या म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहिलेली मॉडेल, अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे ४२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. शेफाली तिच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. दरम्यान, तिच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. डॉक्टरांनी याबाबतचा अहवाल राखून ठेवला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुरुवातीला शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली होती. पण तिच्या मृत्यू प्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

Shefali Jariwala
shefali Jariwala Parag tyagi : कोण आहे शेफाली जरीवालाचा नवरा पराग त्यागी? होते सुशांत सिंग राजपूतशी कनेक्शन

तिच्या अचानक निधनाने चाहत्यांना आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला. कूपर रुग्णालयात पोस्टमॉर्टम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिचे पार्थिव तिच्या घरी आणण्यात आले. यावेळी शेफालीची आई सुनीता यांना अश्रू अनावर झाले. तिच्या पार्थिवावर ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Shefali Jariwala
अभिनेत्री शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; सुंदर दिसण्यासाठी घेत होती उपचार, डॉक्टरांनी दिली माहिती

मृत्यू प्रकरणी चौकशी सुरु

रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांनी तिच्या मृत्यू प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा एक भाग म्हणून, तिच्या निधनापूर्वी नेमके काय घडले? हे समजून घेण्यासाठी तिच्या घरातील स्वयंपाकी आणि घरकाम करणाऱ्या नोकराची चौकशी केली जात आहे.

कूपर रुग्णालयाने शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूबाबत जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शेफाली जरीवाला (वय ४२) हिला बेलेव्ह्यू रुग्णालयातून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मेडिकल कॉलेज आणि डॉ. आरएन कूपर रुग्णालयात आणण्यात आले. बेलेव्ह्यू रुग्णालयामध्येच तिला मृत घोषित करण्यात आले होते. तिचा मृतदेह रात्री १२:३० वाजता कूपर रुग्णालयात आणण्यात आला. सरकारी डॉक्टरांनी त्यावर पोस्टमॉर्टेम केले.

सुरुवातीला 'कांटा लगा' या रीमिक्स म्युझिक व्हिडिओमधील बोल्ड अदाकारीने शेफाली प्रसिद्धीच्या झोतात आली होती. या गाण्याच्या लोकप्रियतेमुळे तिला "कांटा लगा गर्ल" असे टोपणनाव पडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news