Hardik-Ishita Raj| अभिनेत्री इशिता राजने दिली प्रेमाची कबुली, 'मी हार्दिकवर प्रेम करते'

Actress Love with Hardik Pandya | इशिता राज हार्दिक पांड्याच्या प्रेमात?
Bollywood Actress Love with Hardik Pandya
इशिता राजने हार्दिक पांड्या आवडत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - नताशा - हार्दिक यांच्या घटस्फोटानंतर आता एक नवी अपडेट समोर आली आहे. एका अभिनेत्रीने हार्दिक पांड्याबद्दल आपल्या प्रेमाची कबुली दिलीय. एका मुलाखतीत अभिनेत्री इशिता राजने आपल्या प्रेमाची कबुली दिली. ती हार्दिक आणि नताशा दोघांबद्दल बातचीत केली. तिने उडघपणे हार्दिक बद्दल आपले प्रेम व्यक्त केले. इशिता राज ही ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात दिसली होती.

हार्दिक पांड्यावर प्रेम करतेय ही अभिनेत्री

मुलाखतीत इशिताला हार्दिक पांड्याबद्दल विचारले त्यावेळी ती म्हणाली, ''मी त्याच्याविषयी काय बोलू, तो उत्तम क्रिकेटर ऑलराऊंडर आहे. तो खेळताना पाहणे खूप शानदार ठरतं. तो माझा फेव्हरेट आहे. मी त्याच्यावर प्रेम करते. तो माझा क्रश आहे. तुम्ही म्हणून शकता की, हे एकतर्फी प्रेम आहे, फॅन होण्याच्या नात्याने.''

इशिता राज काय म्हणाली नताशाबद्दल?

इशिताने नताशा बद्दल सांगितले की, मी नताशाला भेटले आहे. आम्ही सोनू की टीटू की स्वीटी चित्रपटात काम केलं आहे. त्या चित्रपटात तिचे एक आयटम सॉन्ग होता. पण आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही. इशिताने नताशाला एक हॅशटॅग दिले.ती म्हणाली, ‘हॅशटॅग प्रिटी’. इशिताने सांगितले की, नताशा खूप सुंदर आहे.

नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट होऊन काही दिवस झाले आहेत. नताशा सध्या सर्बियामध्ये आहे.

Bollywood Actress Love with Hardik Pandya
Lakhat Ek Amcha Dada | लाखात एक आमचा दादा : सूर्या, तुळजासाठी आगीत उडी टाकणार!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news