

Ileana D'Cruz having second baby:
साऊथ सिनेमे असो की बॉलीवूड इलियाना डी'क्रुजने सगळीकडेच अभिनयाची छाप उमटवली आहे. ईलियाना अलीकडे मल्टीस्टारर दो और दो प्यार मध्ये दिसली होती. तिने नुकत्याच झालेल्या फादर्स डेला तिने खास पोस्टही शेयर केली होती. यामध्ये तिने पार्टनर मायकेल डोलनला खास आनंदांजत शुभेच्छा दिल्या होत्या. यावरून तिच्या फॅन्सनी अंदाज बांधायला सुरू केले आहेत की ती पुन्हा आई बनली आहे.
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे जाहीर केले होते. अर्थात इलियाना आणि मायकेल या दोघांनीही याबाबत कोणतेही जाहीर विधान केलेले नाही. ईलीयाना ने शेयर केलेल्या फोटोमध्ये तिने मायकेल आणि बाळाचा फोटो शेयर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, 'सगळ्यात चांगल्या माणसाला फादर्स डेच्या शुभेच्छा. तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता तो तुमच्या मुलांचा सर्वोत्तम वडील असतो या आनंदाची तुलना कशाचीच होऊ शकत नाही.’
ऑगस्ट 2023 मध्ये इलियानाने कोआ फिनिक्स डोलनला जन्म दिला होता. यावेळी तिने एका रीलच्या माध्यमातून दुसऱ्यांदा आई होणार असल्याचे जाहीर केले होते. तिचा पहिला मुलगा आता दीड वर्षांचा आहे. आता इलियाना दुसऱ्या बाळाची ऑफिशियल घोषणा कधी करते याकडे तिच्या चाहत्यांचे लक्ष आहे.