

मुंबई - सर्वात लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये नवं ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये चारूची भूमिका साकारणारी सलोनी संधू हिने शोमधील तिचा प्रवास संपवला आहे. तिने सोशल मीडियावर भावनिक निरोप शेअर केलाय. यामध्ये कलाकार आणि क्रूचे आभार मानले. एका भावनिक संदेशासोबतच तिने तिच्या YRKKH टीमसोबतचे खास क्षणही शेअर केले आहेत.
'ये रिश्ता क्या कहलाता है' च्या आगामी एपिसोड्समध्ये दाखवलं जाईल की, चारूचा मृत्यू जपानमध्ये झाला आहे. अभीर हेच सांगण्यासाठी उदयपूर आला होता. पण अभिराच्या लग्नाचे वृत्त ऐकून शांत राहतो.
सलोनीने लिहिलं, "अलविदा म्हणणं सोपं नाही. पण प्रत्येक प्रवासाचा शेवट होतो. चारूची भूमिका साकारणे माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणांपैकी एक आहे. त्या भूमिकेत मी जीव ओतला होता आणि बदल्यात मला आपलं प्रेम, शक्ती, अनुभव आणि आगमित आठवमी मिळाल्या. 'ये रिश्ता क्या कहलाता है'ची टीम, जिने मला चारूची भूमिका दिली आणि माझ्यावर विश्वास, त्यांचे आभार. माझे सह-कलाकार, जो माझा परिवार बनला, त्यांना खूप सारं प्रेम...सर्व सुंदर फॅनपेजेस, प्रत्येक एडिट, प्रत्येक पोस्ट, प्रत्येक क्षणासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचं प्रेम माझ्यासाठी या जगापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे. मी सर्वकाही रिशेअर आणि रीपोस्ट करू शकत नाही.."
या मालिकेत चारुची दमदार भूमिका होती. पण तिने मालिका का सोडली, हे न कळल्यामुळे फॅन्स हैराण झाले आहेत. गोएंका परिवाराला जेव्हा चारुच्या मृत्यूबद्दल कळणार, तेव्हा या मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणं रंजक ठरेल.