Ashlesha Savant | २३ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून ४१ व्या वर्षी बांधली लग्नगाठ; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो व्हायरल

Ashlesha Savant | २३ वर्षे लिव्ह-इनमध्ये राहून ४१ व्या वर्षी बांधली लग्नगाठ; या प्रसिद्ध अभिनेत्रीचे फोटो व्हायरल
image of Ashlesha Savant
Ashlesha Savant got married Instagram
Published on
Updated on
Summary

अभिनेत्री अ‍ॅश्लेशा सावंतने तब्बल २३ वर्षांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपनंतर ४१ व्या वर्षी साध्या समारंभात लग्न केले. विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मुंबई - टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अ‍श्लेषा सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तब्बल २३ वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर अखेर ४१ व्या वर्षी तिने आपल्या जीवनातील मोठा निर्णय घेत लग्नगाठ बांधली. तिच्या या खास दिवसाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

image of Ashlesha Savant
Akhanda 2 Trailer: महाकुंभची महाझलक, बालकृष्ण नव्या अवतारात तर बजरंगी भाईजानची 'मुन्नी'चा ही अद्भूत सीन

अ‍श्लेषा आणि तिचा जोडीदार यांची ओळख त्यांचे करिअर सुरू असताना झाली होती. दोघेही टीव्ही इंडस्ट्रीत कार्यरत असल्याने त्यांची मैत्री आणि नंतर प्रेम होत गेलं. दोघांचे प्रेम 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधून सुरू झाले होते आणि मग दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले.

image of Ashlesha Savant
Ananya Panday-Kartik Aryan | कार्तिकच्या वाढदिवसाला मोठं गिफ्ट; 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' रोमँटिक टीझर रिलीज

अश्लेषा सावंतने अनुपमा टीव्ही मालिकेत काम केलं आहे. तिने संदीप बसवानाशी १६ नोव्हेंबर, २०२५ रोजी वृंदावनच्या चंद्रोदय मंदिरात लग्न केलं. हे लग्न खासगी सोहळा होता. केवळ कुटुंबीय आणि जवळचे लोक यामध्ये सहभागी झाले होते. या कपलने इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे फोटो देखील शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघे खूप सुंदर दिसताहेत.

तिने पावडर पिंक कलरची साडी नेसलीय आणि मिनिमम ज्वेलरी सोबत लूक पूर्ण केलाय. ब्रायडल लूकमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. तर संदीप आयवरी कलरच्या शेरवानीमध्ये दिसत आहे.

फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "आणि बस अशा प्रकारे आम्ही मिस्टर आणि मिसेसच्या रूपात एक नव्या चॅप्टरमध्ये एन्ट्री केली. परंपरेने आमच्या मनात खास जागा निर्माण केली. आम्ही आपल्या सर्वांच्या आशीर्वादासाठी आभारी आहे. मी बस इतकचं म्हणू इच्छिते की, जस्ट मॅरिड."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news