आदिती राव हैदरी- सिद्धार्थ अडकले विवाहबंधनात; लग्नाचे फोटो आले समोर

Aditi Rao Hydari-Siddharth | दक्षिण भारतीय पद्धतीने पार पडला विवाह सोहळा
Aditi Rao Hydari-Siddharth
आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी लग्नगाठ बांधली आहे.(Image source- Aditi Rao Hydari Instagram)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ (Aditi Rao Hydari-Siddharth) यांनी लग्नगाठ बांधली आहे. एका सुंदर अशा दक्षिण भारतीय विवाह सोहळ्यात दोघे विवाहबद्ध झालेत. या नवदाम्पत्याने त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघांनीही लग्नावेळी भारतीय पारंपारिक पोशाख परिधान केला होता. यावेळी त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळची मित्रमंडळी उपस्थिती होती.

अदितीचा टिश्यू ऑर्गेन्झा लेहेंग्यात सुंदर लूक

एका ऐतिहासिक मंदिरात हा विवाहसोहळा पार पडला. अदितीने लग्नाचे फोटो, "तू माझा सूर्य, माझा चंद्र आणि माझे सर्व तारे आहेस." अशी कॅप्शन देत शेअर केलेत. अदितीने एक आकर्षक टिश्यू ऑर्गेन्झा लेहेंगा मॅचिंग गोल्डन ब्लाउजसह परिधान केला होता. त्यावर सोनेरी जरी वर्क होते. तसेच त्यावर फिचर्ड स्ट्रीप्चेस आणि हँड एम्ब्रॉयडरी केलेली बॉर्डर दिसते. सोन्याचे आणि रुबीच्या पारंपारिक सोन्याचे दागिने, सैल बांधलेल्या वेणीत गजरा असा आदितीचा वधू लूक होता. वर म्हणून सिद्धार्थने एक साधा कुर्ता परिधान केला होता. त्यावर सुरेख अशी एम्ब्रॉयडरी केलेली दिसते. अदिती आणि सिद्धार्थ कॅमेऱ्यासमोर पोझ देत असताना सर्वात आनंदी दिसले.

'ते सगळं किती स्वप्नवत होतं'

हे दोघे गेल्या काही वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यांनी आज सोमवारी, १६ सप्टेंबर रोजी गुपचूप लग्न उरकून त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. याआधी Vogue ला दिलेल्या मुलाखतीत आदितीने सिद्धार्थने तिला लग्नासाठी प्रपोज केलेल्या क्षणाविषयी सांगितले होते. हे सगळे किती स्वप्नवत वाटत होते, असे तिने म्हटले होते.

Aditi Rao Hydari-Siddharth
आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांचा रोमॅँटिक लूक.(Image source- Aditi Rao Hydari Instagram)

Aditi Rao Hydari-Siddharth : अशी सुरु झाली होती दोघांची लव्हस्टोरी

२०२१ मध्ये दोघांची पहिल्यांदा तेलगू चित्रपट महा समुद्रमच्या सेटवर भेट झाली होती. सिद्धार्थने तिला पहिल्यांदा "हॅलो, beautiful girl" असे म्हटले होते. तिने त्याच मुलाखतीत पुढे म्हटले होते की त्यांचे बाँडिंग इतके सोपे होते की ते किशोरवयात भेटले असते तरी ते लगेच एकमेकांच्या प्रेमात पडले असते.

Aditi Rao Hydari-Siddharth
Stree 2 : श्रद्धाच्या 'स्त्री-२'नं कमावला ५४७.९५ कोटींचा गल्ला; 'अॅनिमल'ला टाकलं मागे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news