

Pankaj Tripathi Mother Death
मुंबई : अभिनेता पंकज त्रिपाठीची आईचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ३१ ऑक्टोबर, २०२५ रोजी हेमवंती देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्रिपाठी परिवाराने एका माध्यामाला ही माहिती दिलीय. पंकज त्रिपाठी यांच्या परिवाराने सांगितलं की, “आम्हाला हे सांगताना खूप दु:ख होत आहे की, श्री पंकज त्रिपाठी यांची प्रेमळ आई श्रीमती हेमवंती देवी यांचे शुक्रवारी बिहारमधील गोपालगंजच्या बेलसंडमध्ये पैतृक घरात निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या आणि काही काळापासून आजारी होत्या...त्याच्या शेवटच्या क्षणी पंकज त्रिपाठी त्यांच्यासोबत होते”.
पंकज त्रिपाठीच्या टीमने फॅन्सना केले ही विनंती
त्रिपाठी परिवाराने पुढे म्हटलंय- “त्रिपाठी परिवार या मोठ्या नुकसानीचे दु:ख व्यक्त करत आहे. नम्रतापूर्वक सर्वांना विनंती आहे की, श्रीमती हेमवंती देवीला आपल्या प्रार्थनेत आठवणीत ठेवा. परिवार मीडिया आणि शुभचिंतकांना सर्वांना विनंती करतो की, ते दु:खाच्या समयी या क्षणात त्यांच्या प्रायवेसीचा सन्मान करावा आणि त्यांना शांतीपूर्वक शोक व्यक्त करण्यासाठी वेळ द्यावा.”
हेमवंती देवी यांच्या पार्शिवावर अंत्यसंस्कार बेलसंडम करण्यात आले, परिवार आणि जवळचे सदस्य, नातेवाईक आणि मित्र यांवेली उपस्थित हते. पंकज यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांचे २१ ऑगस्ट, २०२३ रोजी निधन झाले होते. त्यावेळी पंकज त्रिपाठी मुंबईमध्ये 'OMG २' चे प्रमोशन करत होते. त्यावेळी ते तत्काळ बिहारला परतले होते.
पंकज त्रिपाठी यांचे आगामी प्रोजेक्ट
पंकज त्रिपाठी यांच्याकडे 'मिर्जापूर: द मूवी' असून यामध्ये ते 'कालीन भैया'च्या भूमिकेत दिसेल. २०२६ मध्ये चित्रपट रिलीज होण्याची अपेक्षा आहे. 'पारिवारिक मनोरंजन' आणि 'पति पत्नी और वो दो' हे दोन चित्रपट देखील त्यांच्या झोळीत आहेत.