Dilip Prabhavalkar Dashavatar | कोकणच्या लाल मातीत रुजलेला 'दशावतार' येतोय

Dilip Prabhavalkar Dashavatar Konkan | कोकणच्या मातीत सजलेली एक भव्य गाथा पडद्यावर साकारली जातेय
image of movie Dashavatar poster
Dilip Prabhavalkar different role in Dashavatar Instagram
Published on
Updated on

Dilip Prabhavalkar different role in Dashavatar

मुंबई - चिमणराव, श्रीयुत गंगाधर टिपरे, चिंची चेटकीण, चौकट राजा, तात्या विंचू या आणि अशा अनेकविध भूमिकांना मालिका, रंगभूमी आणि चित्रपटाच्या पडद्यावर सजीव करणारे नटश्रेष्ठ दिलीप प्रभावळकर वयाच्या या टप्प्यावर पुन्हा एका नव्या अवतारात रूपेरी पडद्यावर रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. “दशावतार“ या निसर्गरम्य कोकणच्या पार्श्वभूमीवर बनलेल्या, एका सस्पेन्स थ्रिलर भव्य चित्रपटात ते अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. आजवरच्या त्यांच्या भूमिकांपेक्षा ही वेगळीच भूमिका असणार आहे.

झी स्टुडियोज् प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित “दशावतार” हा चित्रपट कोकणातील अद्भुत निसर्ग, तिथल्या रूढीपरंपरा, मान्यता, लोककला यांचं मनोरम्य दर्शन घडवणारा आणि तितकीच त्याला गूढ, उत्कंठावर्धक, वेगवान, थरारकथेची जोड असलेला हा चित्रपट आहे.

image of movie Dashavatar poster
Mrunmayee Deshpande Manache Shlok | एकच महिना बाकी! मृण्मयी देशपांडेचा ‘मना’चे श्लोक यादिवशी येतोय भेटीला

या चित्रपटाची कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती सुजय हांडे, ओंकार काटे, सुबोध खानोलकर, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे, विनायक जोशी यांनी केली आहे. तर चित्रपटाचे कलानिर्माते अजित भुरे असून कोकणात घडणाऱ्या गूढ कथेवर दशावतार चित्रपटाची बांधणी करण्यात आली आहे.

image of movie Dashavatar poster
Chala Hawa Yeu Dya Anchor | गर्विष्ठ माणसाचे अध:पतन होते; शरद उपाध्येंनी टोचले नीलेश साबळेचे कान

१२ सप्टेंबर ला हा चित्रपट रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. याची पहिली झलक लवकरच झी मराठीवर रसिकांना पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news