अभिनेता ‘चैतन्य सरदेशपांडे’चा ‘एक सुलगता सवाल’ लवकरच

चैतन्य सरदेशपांडे
चैतन्य सरदेशपांडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, वडील धनंजय सरदेशपांडे यांच्याकडून अभिनय आणि लेखनाचं बाळकडू मिळाले. मराठी मालिकांमध्ये झळकणारा अभिनेता चैतन्य सरदेशपांडे आता 'एक सुलगता सवाल…' या हिंदी लघुपटातून अनोखी भूमिका साकारणार आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेत त्याने महत्वाची भूमिका साकारली होती.

'एक सुलगता सवाल…' ही कलाकृती प्रभू कुंज प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केली आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रदीप दळवी यांनी याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

लघुचित्रपटाचे छायाचित्रण सचिन लोखंडे यांनी केले आहे. अभिनेते सुनील गोडबोले, चैतन्य सरदेशपांडे आणि प्रदीप पटवर्धन यांनी कथेला न्याय देणाऱ्या आपल्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच अभिनेत्री सुप्रिया गायगे, ज्योत्स्ना विल्सन आणि ज्योती निसाल या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा लघुचित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या अनेक नामांकित चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांच्या मनात एक धगधगता विचार पेरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news