पुढारी ऑनलाईन डेस्क - ‘अबीर गुलाल’ सध्या दिवाळीच्या सणात नवे रंग भरत आहे. या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांमध्ये एक खास जागा मिळवली असून, श्री आणि अगस्तच्या प्रेमकथेतील उत्कंठा प्रेक्षकांना मोहात पाडत आहे. दिवाळीच्या सणाचा आनंद श्री आणि अगस्तच्या आयुष्यात पाहायला मिळत असला तरी, एक अनपेक्षित वळण त्यांच्या नात्यात ताण निर्माण करताना दिसत आहे. श्री आपल्या पहिल्या दिवाळीसाठी मोठ्या उत्साहात असते; फराळ, फटाके, आणि भाऊबीज याचा आनंद साजरा करत असताना अचानक तिचे मंगळसूत्र तुटते. त्या क्षणी, दूसरीकडे अगस्तच्या गाडीचा अपघात होतो.
या घटनेने श्री आणि अगस्तच्या नात्यावर नव्या संकटांची सावली येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. श्री आणि अगस्तच्या नात्यात येणारी आव्हाने, या संकटाचा त्यांच्या प्रेमावर होणारा परिणाम, आणि त्यातून ते कसे बाहेर पडतील, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना या आगामी भागांची प्रतीक्षा करावी लागेल.