पुढारी ऑनलाईन डेस्क : मिस्टर 'परफेक्शनिस्ट' आमिर खानचा गजनी चित्रपटाचा सीक्वल येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. २००८ मध्ये 'गजनी' चित्रपट रिलीज झाला होता. (Ghajini 2) आता सिक्वेलच्या संदर्भात निर्माता अल्लू अरविंद आणि मधु मंतेना यांच्याशी चर्चा करत आहे. दरम्यान, अल्लू अरविंदने साऊथ स्टार सूर्यासोबत तामिळमध्ये 'गजनी २' बनवण्याची योजना आखली असून सूर्यानेही याबाबत खुलासा केला आहे. (Ghajini 2)
एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, सुर्या आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, 'बऱ्याच दिवसांनी अल्लू अरविंदला ही कल्पना (सीक्वलसाठी) आली आणि त्यांनी विचारले की, ते शक्य होईल का. सूर्या म्हणाला, नक्कीच होईल. सर, आपण यावर विचार करू शकतो. आचा चर्चा सुरू झाली आहे. 'गजनी २' बनवता येईल, असे म्हटले जात आहेत.
अल्लू अरविंद आणि मधु मंटेना 'गजनी २' च्या हिंदी आणि तमिळ व्हर्जनचे शूटिंग एकाच वेळी करायचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. रिपोर्टनुसार, आमिर आणि सूर्या दोघेही 'गजनी २' बद्दल उत्सुक आहेत. पण दोन्ही अभिनेत्यांच्या अभियाचा परिणाम रिमेकवर होऊ शकतो. एक चित्रपट दुसऱ्या चित्रपटाच्या आधी प्रदर्शित झाल्यास दोन्ही चित्रपटांची उत्कंठा कमी होऊ शकते, अशी भीती आहे.
आमिर आणि सूर्या दोघांनाही या प्रोजेक्टची उत्सुकता आहे. परंतु अंतिम स्क्रिप्टची प्रतीक्षा आहे. स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे आणि २०२५ च्या मध्यापर्यंत ते काम अंतिम होईल, असे म्हटले जात आहे.