पुन्हा निवेदिता सराफ भेटीला, नवी मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!'

Aai Aani Baba Retire Hot Aahet | यादिवशी सुरु होतेय नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत!
Aai Aani Baba Retire Hot Aahet new tv serial
नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत! भेटीला येत आहे instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाहवर नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत येतेय. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका एका जोडप्याभोवती फिरते ज्यांना खरंतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे. मात्र न संपणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ते अडकले जातात. अभिनेत्री निवेदिता सराफ आणि मंगेश कदम या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.

निवेदिता सराफ म्हणाल्या, आमच्या वयाच्या नटांची नेहमी एक खंत असते की, आता आपल्यापाशी अनुभवाची शिदोरी आहे. मात्र तरीही आई-वडिलांच्या भूमिकांमध्ये न अडकता आपल्यासाठीही मध्यवर्ती भूमिका लिहिली जावी. टीव्ही माध्यमाची मी आभारी आहे की आम्हाला मध्यवर्ती घेऊन भूमिका लिहिल्या जात आहेत. या मालिकेतलं सुधा हे पात्र मला खूपच भावलं. ‘माझ्यासोबत आता तू देखिल संसारातून रिटायर हो’ हे नवऱ्याचं म्हणणं तिला पटतं मात्र तिचं मन मात्र हे मानायला तयार नसतं. घर-संसारात तिचा जीव अडकला आहे. प्रत्येक गृहिणीला आपलसं वाटेल असं हे पात्र आहे अशी भावना निवेदिता सराफ यांनी व्यक्त केली.

अभिनेते मंगेश कदम म्हणाले, मालिकेचा विषय आपल्या खूप जवळचा आहे. रिटायरमेंट नंतर काय करायचं हे प्रत्येकाने ठरवलेलं असतं. यशवंतचं देखील असचं एक स्वप्न आहे. कोकणातल्या घरी आपल्या पत्नीसोबत निवांत आयुष्य जगायचं असं त्याने मनाशी ठरवलेलं आहे. यशवंतप्रमाणे जवळपास प्रत्येकाचचं हे स्वप्न असतं. मात्र आई-बाबा आपल्या जबाबदारीमधून कधीही रिटायर होत नाहीत. नात्यांची उत्तम गुंफण असणारी हृदयस्पर्शी कथा घेऊन येतोय याचा खूप आनंद आहे असं मंगेश कदम म्हणाले.

नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत २ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता भेटीला येत आहे.

Aai Aani Baba Retire Hot Aahet new tv serial
साऊथ स्टार सामंथा रुथ प्रभूला पितृशोक, भावूक करणारी पोस्ट व्हायरल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news