Aai Aani Baba Retire Hot Aahet | नवी मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!'

निवेदिता सराफची नवी मालिका 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत!'
Aai Aani Baba Retire Hot Aahet
आई आणि बाबा रिटायर होत आहेत नवी मालिका लवकरचंInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क - स्टार प्रवाह नवी मालिका आई आणि बाबा रिटायर होत आहेत, आणत आहे. मालिकेचं शीर्षक ऐकताक्षणीच आपल्या डोळ्यासमोर आपले आई-बाबा नक्कीच उभे रहातात. प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं. आयुष्यभर खस्ता खाऊन आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात. मुलं शिकून स्वत:च्या पायावर उभी रहातात, त्यांच्या संसारात रमूनही जातात.

आई-वडील मात्र घरच्या जबाबदारीतून कधीही रिटायर होत नाहीत. मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची नोकरी, त्यांचं लग्न आणि नंतर नातवंडं एकामागोमाग येणाऱ्या या जबाबदारीच्या चक्रात ते नकळतपणे अडकून जातात. आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका देखिल अशाच एका जोडप्याभोवती फिरते, ज्यांना खरतर घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त तर व्हायचं आहे मात्र न संपणारं जबाबदारीचं ओझं त्यांच्यावर नकळतपणे लादलं जातं. दिग्गज कलावंत निवेदिता सराफ आणि मंगेश जाधव या नव्या मालिकेतून भेटीला येणार आहेत.

Aai Aani Baba Retire Hot Aahet
Sector 36 Trailer पाहाच! सीरीयल किलरच्या भूमिकेत विक्रांत मेसी (Video)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news