jacqueline fernandez : चर्चा जॅकलिनच्या लवबाईटची; इंटीमेट फोटो व्हायरल

Jacqueline Fernandez-sukesh
Jacqueline Fernandez-sukesh
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ( Jacqueline Fernandez ) तिच्या कथित प्रियकर तसेच खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या जॅकलिनचा सुकेशसोबतचे काही प्रायव्हेट फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले आहेत. या इंटिमेट फोटोमुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. जॅकलिनने सुकेश सोबतच्या नातेसंबधांना नकारले असले तरी व्हायरल या फोटोंवरुन सुकेश आणि जॅकलिनचे प्रेमसंबध असल्याचे स्पष्ट होत आहे.

२०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तिहार तुरुंगात अटकेत असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. या बहाद्दराने तुरुंगात राहून खंडणी कशी लुटली असेल असे अनेक प्रश्न तपास अधिकाऱ्यांपुढे निर्माण झाले आहेत. याचे अनेक अभिनेत्रींशी संबध असल्याचे उघड झाले आहे.

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि सुकेश चंद्रशेखर रिलेशनशीपमध्ये असल्याचा खुलासा सुकेशच्या वकीलांनी केला होता. यानतंर त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियात वायरल झाले होते. जॅकलिनने २०१७ पासून आमची ओळख असल्याचे कबूल केले होते पण, तिहारच्या तुरुगात गेल्यापासून मी त्याला भेटलेली नाही असे देखिल तिने सांगितले होते.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला (Jacqueline Fernandez) अनेक महागड्या किंमतीच्या भेट वस्तू दिलेल्या आहेत. त्या मध्ये मोठ मोठ्या ब्रँडच्या वस्तूंचा समावेश आहे. सुरेशने जॅकलिन एक मोठ्या ब्रँडेड कंपनीचे जिम वेअर, घड्याळे, शूज यासह सोने व हिऱ्यांची आभुषणे, महागड्या बॅगा अशा कोट्यवधी रुपयांची भेटवस्तू त्याने दिले आहेत. तर सुकेशने जॅकलिनला मिनी कपूर ही कार भेट केली. शिवाय तिच्या आईला देखिल मोठी महागडी कार भेट म्हणून दिली होती.

सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला इतक्या महागड्या भेटवस्तू या का दिल्या असतील हे साहजिकच सर्वांच्या लक्षात येईल. यावरुन त्यांच्यातील प्रेमसंबधाचा खुलासा होता. आता यांच्या कथित प्रेमाचा मोठा खुलासा होताना पुन्हा एकदा पहायला मिळतो आहे. सध्या सुकेश आणि जॅकलिनचा एक प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर होत आहे. त्यांच्या या प्रायव्हेट आणि इंटिमेट फोटोमध्ये ते एकमेकांना अलिंगन देताना दिसत आहेत. तर जॅकलिनच्या मानेवर लवबाईट स्पष्टपणे दिसत आहे. सध्या या लवबाईटची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे.

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर यांचे नवनवीन खुलासे बाहेर पडत आहेत. या सर्वच प्रकरणाचा तपास अंमलबजावनी संचलनालय ( ED ) करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news