विजय देवराकोंडा – रश्मिका मंदाना यांचे स्पेशल डिनर डेट; नेमक काय शिजतंय ?

विजय देवराकोंडा – रश्मिका मंदाना यांचे स्पेशल डिनर डेट; नेमक काय शिजतंय ?
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सध्याचा आघाडीचा साऊथचा सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि नॅशनल क्रश ठरलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या रिलेशनशीपच्या ( Vijay Deverakonda – Rashmika Mandanna ) चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

या दोघांनी वारंवार याबाबत नकार दिला असला तरी यांच्यामध्ये काहितरी शिजतंय हे मात्र नक्की. नुकतेच या दोघांनी गोव्यामध्ये एकत्र न्यू इअर साजरा केला. यामुळे त्यांच्या रिलेशनशीपची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. तर नुकतेच ते मुंबई येथे स्पेशल डिनर डेट करताना कॅमेरॅत कैद झाले आहेत.

साऊथच्या चित्रपट सृष्टीसाठी २०१८ आणि २०१९ हे साल खूपच महत्त्वाचं होत. २०१८ मध्ये विजय देवराकोंडा आणि रश्मी मंदाना ( Vijay Deverakonda – Rashmika Mandanna ) यांचा 'गीता गोविंदम' हा चित्रपट आला. या चित्रपटाला साऊथने डोक्यावर घेतले. या पाठोपाठ याच जोडीचा 'डिअर कॉम्रेड' हा चित्रपट २०१९ साली आला. या जोडीने सलग दोन हिट चित्रपट दिले. तसेच साऊथला विजयच्या रुपाने नवा सुपरस्टार मिळाला. तसेच रश्मिका मंदाना तर नॅशनल क्रश ठरली. अगदी तेव्हा पासूनच हे दोघे रिलेशनमध्ये असल्याचं वारंवार बोललं गेलं. परंतु अनेक वेळा या दोघांनी या बातमीला दुजोरा दिला नाही. तसेच अनेक वेळा अधून मधून यांच्या रिलेशनशीपच्या बातम्या या येत राहिल्या.

या दोन्ही चित्रपटांमुळे दोघांकडे सिनेमांची रीघ लागली आहे. शिवाय या दोघांसाठी बॉलिवूडचे दरवाजे उघडे झाले आहेत. सध्या विजय देवराकोंडाचा 'लायगर' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. तर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबतच्या 'मिशन मंजू' या सिनेमाच्या चित्रिकरणात रश्मिका व्यग्र आहे. पण सतत आपल्या नात्याचा माध्यमांसमोर नकार देणारे विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदाना यावेळी मात्र त्याचे मधूर नाते लपवू शकले नाहीत. ( Vijay Deverakonda – Rashmika Mandanna )

विजय आणि रश्मिका दोघांनी आपल्या नव वर्षाचे स्वागत गोव्यामध्ये केले. दोघेही गोव्यात एकत्र होते. सोबत विजयचे कुटुंबिय देखिल हजर होते. विजयच्या फॅमिलीने गोव्यात न्यू इअर व्हेकेशन प्लॅन केला होता. यामध्ये रश्मिकाने देखिल सहभागी झाली होती.

रश्मिकाने सोशल मीडियावर चाहत्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा देत गोव्यातील फोटो शेअर केला होता. अगदी त्या ठिकाणचा फोटा विजयचा भाऊ आनंद याने देखिल शेअर केला. यामुळे दोघेही गोव्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. तेव्हा पासून पुन्हा विजय आणि रश्मिकाच्या रिलेशनबाबत चर्चा होऊ लागली.

नुकतेच विजय देवराकोंडा आणि रश्मिका मुंबई येथील एका मोठ्या रेस्टॉरंट मधून डिनर घेऊन बाहेर पडताना कॅमेराबद्ध झाले. गोव्यानंतर अगदी चार-पाच दिवसात ते मुंबईत स्पेशल डिनर डेट करताना आढळले. तसेच जाताना दोघे एकाच कार मधून गेले. अद्याप दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केला नाही. पण, दोघांच्या स्पेशल डेटमुळे चाहत्यांनी दोघांच्या नात्यामध्ये काही तरी शिजत आहे हे समजून घेतलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news