

पुढारी ऑनलाईन डेस्क
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफने तिचा प्रियकर विकी कौशलसोबत आज ९ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली. दोघांनीही आपल्या कुटूंबीयांसमोर ७ फेरे मारून आपल्या वैवाहिक जीवनाची सुरवात केली आहे. (VicKat Wedding)
विकी-कॅटच्या लग्नाचे अधिकृत फोटो आज दिवसभर कोठेही शेअर झालेले नव्हते. विकी कॅटचे चाहते आणि सर्व प्रसारमाध्यमे दोघांच्या लग्न समारंभाचे फोटो पाहण्यासाठी आतुरलेले होते. फोटो पाहण्याची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली होती. मात्र रात्री उशिरा खुद्द विकीनेच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लग्न समारंभाचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना दिलासा दिला. त्यानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत होते. (VicKat Wedding)
विकी कौशल आणि कॅटरिना कैफच्या जयमाल सोहळ्यासाठी एक खास प्रकारचा म्हणजेच राजवाड्यासारखा दिसणारा स्टेज बनवण्यात आला होता. लग्नाच्या निमित्ताने प्रत्येक वधू-वर विशिष्ट पद्धतीने सजावट करतात. आपली हौस पूर्ण करतात. त्याचपद्धतीने विकी आणि कॅटरिनानेही आपल्या विवाहाच्या खास प्रसंगी सर्व इच्छा पूर्ण केल्या. दोघांनीही राजा-राणीसारखे कपडे घातल्याचेही दिसत आहे.
एकमेकांचा जोडीदार झाल्यानंतर विकी कौशल आणि कॅटरिनाच्या आनंदाला पारावार उरलेला नव्हता. फोटोमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावरचे स्मित स्पष्ट दिसत आहे.
विकी आणि कॅटच्या चाहत्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून शुभेच्छा देत, त्यांची जोडी 7 जन्म सुरक्षित राहावी अशीही प्रार्थना केली आहे.
हेही वाचा