माधवी निमकर
माधवी निमकर

International Yoga Day : माधवी निमकरने केले सर्वात कठीण योगासन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री माधवी निमकरने Happy international yoga day 🌸🌸 म्हणत तिचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. अवघड योगासन करताना तिचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिला योगा डे च्या सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा –

फिटनसे फ्रिक आहे माधवी निमकर

माधवी निमकर फिटनेस फ्रिक असून ती सोशल मीडियावर नेहमी ॲक्टिव्ह असते. तिच्या योगा प्रॅक्टिसचे फोटो आणि व्हिडिओ नेहमी ती शेअर करत असते. तिचे वर्कआऊटचे व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पाहता येतील. माधवीचे इन्स्टाग्रामवर 576K फॉलोअर्स आहेत.

अधिक वाचा –

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधून लोकप्रियता

सुख म्हणजे नक्की काय असंत या मालिकेतून माधवी निमकरला खूप लोकप्रियता मिळाली. तिने या मालिकेत शालिनी ही भूमिका साकारली होती. खलनायकी भूमिका असूनही माधवीला चांगली प्रसिद्धी मिळाली. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

योगाबद्दल काय म्हणते माधवी निमकर?

अनेक कठीण आसने ती सहजपणे करते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे योगासनांचे फोटो, व्हिडिओ नेहमी पाहायला मिळतात. एका मुलाखतीत माधवी म्हणाली की, तिला जीममध्ये व्यायाम करायला आवडायचे. तिला योगासने करायला अजिबातच आवडायचा नाही. पण, हळूहळू सुरुवात केली आणि आवड निर्माण झाली.

logo
Pudhari News
pudhari.news