‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने चक्क सलमानला दिले होते मधुचंद्राचे आमंत्रण

‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने चक्क सलमानला दिले होते मधुचंद्राचे आमंत्रण

पुढारी वृत्तसेवा : बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोवर हे कपल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. या दोघांना देवी नावाची गोड लेकही आगे. सध्या सोशल मीडियावर बिपाशा आणि करणच्या लग्नाचा एक किस्सा चर्चेत आहे. या लग्नात बिपाशाने चक्क सलमानला मधुचंद्राचे आमंत्रण दिले होते.

बिपाशा आणि करण यांनी लग्नानंतर रिसेप्शन पार्टी ठेवली होती. यात सर्वात शेवटी सलमान खान आला होता. यावरून बिपाशा, करण आणि सलमानमध्ये मस्करी सुरू होती. अशा मजेशीर वातावरणात बिपाशाने चक्क सलमानला मधुचंद्राला येण्याचे आमंत्रण दिले होते. एका मुलाखतीत बिपाशा आणि सलमानने हा किस्सा सांगितला होता. सलमान नेहमीच त्याच्या लग्नावरून चर्चत असतो. मुलाखतीत सलमानची बाजू घेत बिपाशा म्हणाली की, माझ्या लग्नात येऊन सलमानने माझी सर्वात मोठी इच्छा पूर्ण केली आहे. आणि आता तो आमच्या मधुचंद्रालाही येणार आहे. बिपाशाच्या या वक्तव्यावरून करणचे हावभाव पाहण्यासारखे होते. बिपाशा आणि सलमान यांची खूप चांगली मैत्री आहे. त्यांनी 'नो एंट्री' या सिनेमात एकत्र काम केले होते. एवढेच नाही, तर सलमानने बिपाशाला लग्नात 10 कोटी रुपयांचा फ्लॅट भेट दिल्याचे सांगितले जात होते; पण या सर्व अफवा असल्याचे बिपाशाने स्पष्ट केले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news