व्यवसाय अयशस्वी झाला अन्‌…; विजय सेतुपती भविष्याबाबत होता अनभिज्ञ

पुढारी ऑनलाईन डेस्क : दाक्षिणात्य सिनेजगतातील विजय सेतुपती हे आघाडीचे नाव आहे. आता एका मुलाखतीत त्याने आयुष्यातील आपल्या अनुभवावर भाष्य केले आहे.

विजय म्हणाला की, "मी कधीही सिनेमात येण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. मला केवळ गरिबीतून बाहेर पडायचे होते. अभिनेता होण्यापूर्वी मी दुबईत अकाऊटंट म्हणून काम करत होतो. मला माझी आठवण येते. एक मुलगा होता, जो खूप निरागस होता आणि त्याला कोणतीही स्वप्ने नव्हती. तो त्याच्या आयुष्यात काय करणार आहे याची त्याला कल्पनाही नव्हती."

"कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत असताना दुसर्‍या वर्षाचा अभ्यासक्रम काय आहे, हे मला माहीत नव्हते. माझे मित्र मला सांगायचे की, हा दुसर्‍या वर्षाचा अभ्यासक्रम आहे. मी खेळ अथवा अभ्यासात चांगला नव्हतो. मी लाजाळू असल्याने माझी एकही मैत्रीण नव्हती. पण आयुष्यात काहीतरी मोठे करायचे होते; पण ते कसे करायचे हे समजत नव्हते. गरिबीतून बाहेर पडणे हेच एकमेव ध्येय होते. मी खूप निष्पाप माणूस होतो."

2003 मध्ये भारतात आल्यानंतर मी लग्न केले आणि मित्रांसोबत इंटिरियर डेकोरेशनचे काम सुरू केले. त्यानंतर एका मार्केटिंग कंपनीत रुजू झालो. माझा व्यवसाय अयशस्वी झाला नसता, तर मी कधीच अभिनेता झालो नसतो.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news