पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सीआयएसएफच्या एका महिला जवानाने अभिनेत्री कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर कानाखाली मारली होती. कंगनाने शेतकरी आंदोलनावेळी जे वक्तव्य केले होते, त्या विरोधात महिला जवानाने निषेध व्यक्त करत कंगनाला मारहाण केली होती. त्याची चर्चा देशभरात चांगलीच रंगली. या घटनेवर विविध स्तरांतून प्रतिक्रिया आल्या होत्या. आता यावर अभिनेत्री स्वरा भास्कर हिने भाष्य केले आहे.
स्वरा म्हणाली की, "कंगनाला कानशिलात मारली गेली; पण जे घडायला नको होते ते घडले. पण किमान ती जिवंत आहे आणि तिच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक आहेत. आपल्या देशात अनेक घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रेल्वेत त्यांना गोळ्या घालून ठार मारले. दंगलीत अनेक लोक मारले गेले आहेत. अशा घटनांची नोंदही झाली आहे. जे लोक या सर्व कृतींचे समर्थन करतात त्यांनी कंगनाच्या प्रकरणात आम्हाला शिकवू नये."
ऑस्कर सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने ख्रिस रॉकला कानाखाली मारली होती. त्यावेळी कंगनाने ट्विट करून या प्रकरणाचे समर्थन केले होते. कंगनाच्या बाबतीत अडचण अशी आहे की, तिने स्वतः या मारहाणीचे समर्थन केले होते.
हेही वाचा